Panvel City Development: पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण आढावा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजनेवर सविस्तर चर्चा
panvel municipal corporation
panvel municipal corporationPudhari
Published on
Updated on

पनवेल: पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा विस्तार गेल्या काही वर्षांत अभूतपूर्व वेगाने झाला आहे. नव्या गृहनिर्माण योजना, औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार, शिक्षण, आरोग्य आणि बाहतूक क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकीमुळे शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. पनवेल हे भविष्यातील जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकसित होत आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, जेएनपीटी, मेट्रो, महामार्ग आणि इतर मोठ्या प्रकल्पांमुळे शहराची लोकसंख्या आणि नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आज घेतलेले निर्णय पुढील अनेक दशकांतील पाणीपुरवठा आणि विकासाचा पाया ठरणार आहेत.

panvel municipal corporation
Uran House Slab Collapse: नवीन शेव्यात घराचा स्लॅब कोसळून तिघे जखमी

त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब सहन केला जाणार नाही. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत आणि नागरिकांना दिलासा मिळेल याची काळजी घ्यावी, असे निर्देश पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले आहेत.

वेगाने विस्तारत असलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.

शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, उड्डाणपूल, रेल्वे फाटकांवरील वाहतूक कोंडी तसेच रखडलेल्या विकास प्रकल्पांना गती देण्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विविध प्रकल्पांचा आढावा घेत आवश्यक निर्देश त्यांनी दिले.

बैठकीस महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये,सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार, स्थायी समितीचे सभापती बबन मुकादम, माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ, प्रवीण पाटील, सुमित झुंजारराव, अजय बहिरा, शत्रुघ्न काकडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

panvel municipal corporation
Poladpur Pune Bus Service: आंबेनळी घाटातून एसटी सेवा बंद; प्रवाशांची गैरसोय

शिलार धरण प्रकल्पासाठी निधी उभारणीवर भर!

पनवेलच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्यासाठी महत्वाचा मानला जाणारा शिलार धरण प्रकल्पही बैठकीचा केंद्रबिंदू ठरला. या धरणातून ७५ टक्के पाणी पनवेल महानगरपालिकेला दिले जाणार आहे. त्यानुसार मनपाकडून खर्च सुद्धा केला जाणार आहे.

या प्रकल्पासाठी आवश्यक निधी कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल, शासनाच्या विविध योजनांमधून आर्थिक तरतूद कशी मिळवता येईल आणि प्रकल्पाला प्रशासकीय गती कशी देता येईल यावर सखोल चर्चा झाली.

पाणी ही केवळ आजची गरज नसून भविष्यातील पिढीसाठीही आवश्यक असलेली जीवनावश्यक बाब असल्याने शिलार धरण प्रकल्पाला प्राधान्य देण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली.

न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा-३ वर सविस्तर चर्चा!

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी हजारो नवीन नागरिक वास्तव्यास येत आहेत. नवीन गृहनिर्माण संकुले, औद्योगिक प्रकल्प, शैक्षणिक संस्था आणि व्यापारी संकुलांमुळे पाण्याची मागणी झापाट्याने वाढत आहे.

विद्यमान जलस्रोतांवर वाढणारा ताण लक्षात घेता न्हावा शेवा योजना टप्पा-३ हा प्रकल्प भविष्यातील पाणीपुरवल्याचा करणा ठरणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.या प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील प्रलंबित टप्पे, तांत्रिक अडचणी, कामांच्या गतीचा बारकाईने आढावा घेण्यात आला प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी आवश्यक समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले.

देहरंग धरणाच्या क्षमतेत वाढ करण्याची चाचपणी!

बैठकीत देहरंग धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव चर्चिला गेला, यासंदर्भात सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा चर्चा झाली. पुढील सभेमध्ये हा विषय सभागृहासमोर मांडला जाणार आहे. धरणाची साठवण क्षमता वाढल्यास महानगरपालिका क्षेत्राला अधिक प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकते. तांत्रिक, पर्यावरणीय आणि प्रशासकीय बाबींचा अभ्यास करून पुढील कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

रेल्वे फाटकांवरील वाहतूक कोंडीवर उपाययोजना,झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन

शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे अनेक रेल्वे फाटकांवर मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होत आहे, नागरिकांचा वेळ, इंधन आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ज्या ठिकाणी रेल्वे फाटक आहेत, तेथे महारेलच्या माध्यमातून उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावाना गती देण्याचे निर्देश आमदार ठाकूर यांनी दिले. महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टीवासीयांचे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुनर्वसन करण्याच्या विषयावरही चर्चा करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news