

समीर बुटाला
पोलादपूर: पोलादपूर वरून पुणे-सातारा जाण्यासाठी जवळचे घाट मार्ग बंद असल्याने पोलादपूर मधील प्रवासी वर्गाला लांबचा व कष्टमय प्रवास करावा लागत आहे.
आंबेनलीसह ताम्हणी घाट बंद असल्याने एसटीच्या अनेक फेऱ्या बंद असल्याने महामंडळाला लाखो रुपयांच्या उत्पनावर पाणी सोडावे लागत आहे. पोलादपूरमधून पुणे किंवा साताराला जाणारी एकही बस नसल्याने या भागातील प्रवासी वर्गाला इतर वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे.
सद्यस्थितीत ताम्हिणी मार्ग, भोरमार्ग व महाबळेश्वर मार्ग प्रशासनाने सर्वच वाहतुकीसाठी बंद केला आहे. प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे मात्र अनेक चारचाकी प्रवासी वाहतूक आंबेनली घाट मार्ग सह वरंध घाट मार्गे मार्गस्त होत आहेत माते एसटी सेवा बंद असल्याने पदरमोड करत प्रवास करावा लागत असल्याची खंत प्रवासी वर्गाने बोलताना व्यक्त केली.
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गवरील रस्ता रुंदीकरण साठी डोंगर रांगा पोखरण्यात आल्याने जुलै २०२६ च्या नैसर्गिक आपत्ती काळात मातीचे ढीग रस्त्यावर कोसळले होते. मात्र तत्काळ बाजूला करण्यात आले. मात्र त्या वेळी प्रशासनाने खबरदारी चा उपाय ३१ जुलैपर्यंत सदरचा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद ठेवला होता.
मात्र आषाढ एकादशी सह आगामी गणपती उत्सवनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या सूचना पुनर्विचार करावा अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे. दक्षिण रायगडमधून पश्चिम महाराष्ट्रमध्ये ये-जा करणारी संख्या जास्त प्रमाणात असल्याने या मार्गवर बस सेवा पूर्वत करण्याची मागणी प्रवासी वर्ग कडून करण्यात येत आहे.
पोलादपूर येथे मुंबई ते पणजी राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ वर शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती अश्वारूढपुतळया पासून मुंबईहून येणाऱ्या प्रवासी व पर्यटकांना राष्ट्रीय महामार्ग कोकणात तर दुसरा राज्यमार्ग महाबळेश्वर, वाई, साताऱ्यापर्यंत घेऊन जातो.
महाबळेश्वर गिरिस्थान थंड हवेचे ठिकाण पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची तसेच सातारा, वाई, कराड, कोल्हापूरपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक आंबेनळी घाटात मोठया प्रमाणात होते. हा संपूर्ण घाटरस्ता दूर्गम आणि त्याभोवतीच्या दऱ्या खूपच खोल आहेत डोगर ची माती कमी केल्याने बरयापैकी रुंदीकरण झाले होते.
मात्र २०२१ च्या नैसर्गिक आपत्ती मध्ये या मार्गाचे होत्याचे नव्हते झाले होते अनेक ठिकाणी हा मार्ग बाधित झाला होता यानंतर काही प्रमाणात दुरुस्ती करत दोन्ही वाहने सुलभपणे मार्गस्त होत होती मात्र २०२६ च्या पावसाळी हंगामात जुलै महिन्यात पासून या मार्गावर लहान मोठी झाड पडण्याच्या घटनेला सुरवात झाली आणि जुलै मध्ये मोठ्या प्रमाणात दरड खाली आल्याने सदरचा मार्ग प्रथम चार दिवस नंतर त्यात वाढ करत रेड व ऑरेंज अलर्ट निहाय ३१ जुलै पर्यत अवजड वाहनांना बंद करण्यात आला होता.
मात्र सद्य स्थितीत पावसाळी पर्यटनाचा हंगाम लक्षात घेता या मार्गवरीन एसटी सेवा पूर्वत करावी जने करून या मार्गवरील प्रवासी वर्गाला हक्काचे प्रवासी साधन उपलब्ध होईल त्याच प्रमाणे या मार्ग वरील लहान हॉटेल धारकांना व्यवसायाला चालना मिळते.