Crime News | तस्करीचा डाव उधळला ! जेएनपीएमधून साडेनऊ टन रक्तचंदन जप्त

माल बेकायदेशीररित्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवण्याचा होता कट
Nine and half tons of raktchandan seized from JNPA
जेएनपीएमधून साडेनऊ टन रक्तचंदन जप्तpudhari photo
Published on
Updated on
उरण : राजकुमार भगत

जेएनपीए बंदरातून सिमाशुल्क विभागाने 9.6 मेट्रिक टन रक्तचंदन जप्त केले आहे. हे रक्तचंदन बेकायदेशीररित्या परदेशात पाठवण्याच्या मार्गावर असताना, कस्टम्सच्या विशेष गुप्तचर आणि अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. या प्रकरणी ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक अक्षय भाऊसाहेब आणि चालक गणेश महादेव सुखधरे यांना एसआयआयबीने अटक करून उरण न्यायालयात हजर केले असता, दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाच्या 15 अधिकार्‍यांचा चमू या कारवाईत सहभागी होते. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

पुष्पा चित्रपटातील रक्त चंदन तस्करीच्या कथानकाला शोभेल अशी ही घटना आहे. वेस्टर्न कमोड टॉयलेट सीट मालाचा सीलबंद कंटेनर म्हणून घोषीत केलेला अख्खा ट्रक सीमाशुल्क विभागाच्या तपासणीनंतर रहस्यमयरित्या गायब झाला होता. त्यानंतर हरवलेल्या कंटेनर सारखाच तपशील असलेला एक नवीन कंटेनर ट्रक पोर्ट टर्मिनल (न्हावा शेवा) येथे आला, ज्यामध्ये 9.6 मेट्रिक टन रक्तचंदन होते. या ऑपरेशनमागील स्मगलिंग सिंडिकेटने या तस्करीसाठी अचूक योजना आखली होती. कस्टमने क्लिअरन्स दिलेल्या कंटेनर प्रमाणे गहाळ झालेले आणि बदललेले कंटेनर या दोन्ही कंटेनरचे वजन तंतोतंत 9.6 मेट्रिक टन एवढेच ठेवण्यात आले होत.कस्टम्सच्या विशेष गुप्तचर आणि अन्वेषण शाखेला याची गुप्त माहिती मिळताच,तत्परतेने 15 अधिकार्‍यांच्या पथकाने 3 सप्टेंबरच्या रात्री उच्चस्तरीय कारवाई सुरू केली. आणि रक्तचंदन तस्करीचा हा कट हाणून पाडला आहे.

हिंगोली : चंदन तस्करप्रकरणी एक ताब्‍यात, साथीदार पसार

एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना सांगीतले की ,अलीकडील रक्तचंदन तस्करीच्या कारवाईमागील विस्तृत योजना उघड केली आहे. वेस्टर्न कमोड टॉयलेट सीट असा माल म्हणून घोषित केलेल्या सीलबंद कंटेनरने भरलेला ट्रक सर्वेश्वर सीएफएस, जेएनपीटी सेझ, सेक्टर-7, नवी मुंबई येथे उभा होता.आयटीसी धारक एलाईट एक्झीम ट्रेडिंगने अधिकृतपणे मालवाहू शारजाहस्थित कंपनीसाठी रवाना करण्यासाठी घोषित केले होते. कंटेनरची कसून तपासणी झाली आणि एसआयआयबीकडून सीमाशुल्क मंजुरी मिळाली. यानंतर, कंटेनर आंतरराष्ट्रीय जहाजावर लोड करण्यासाठी जेएनपीए बंदराकडे रवाना करण्यात आला. मात्र, वाहतुकीदरम्यान ट्रक आणि त्याचा सीलबंद कंटेनर गूढपणे गायब झाला. धक्कादायक घडामोडींमध्ये, आकार, वजन आणि गायब झालेल्या कंटेनर क्रमांकासह समान वैशिष्ट्यांचा एक ट्रक न्हावा शेवा) आला. त्यात एसआयआयबीने जारी केलेले समान कस्टम क्लिअरन्स दस्तऐवज होते.

शारजाहला निर्यात

जप्त करण्यात आलेला माल शारजाह(यूएई) येथे निर्यात करण्यात येणार होता. जप्त लाल चंदनाची बाजारातील किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे. तस्करीची ही कारवाई संघटित आणि आंतरराज्यीय स्वरूपाची आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची शक्यता आहे. ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक अक्षय भाऊसाहेब आणि चालक गणेश महादेव सुखधरे यांना एसआयआयबीने अटक करून उरण न्यायालयात हजर केले.दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Nine and half tons of raktchandan seized from JNPA
Nashik Crime Update | त्या दोन महिलांचे मारेकरी अद्याप फरारच

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news