New Panvel ganja seizure: नवीन पनवेल शहरातील झोपडपट्टीत गांजाची विक्री; ६०० ग्रॅम गांजा जप्त, दोघांना अटक

नवीन पनवेल शहरातील श्रेयस हॉस्पिटल शेजारील झोपडपट्टीतून गांजाची विक्री करणाऱ्या दोन तरुणांना नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली.
New Panvel ganja seizure
New Panvel ganja seizure
Published on
Updated on

New Panvel ganja seizure

पनवेल : विक्रम बाबर

नवीन पनवेल शहरातील श्रेयस हॉस्पिटल शेजारील झोपडपट्टीतून गांजाची विक्री करणाऱ्या दोन तरुणांना नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. पोलिसांनी संबंधित ठिकाणाहून सुमारे ६०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नवीन पनवेल शहरातील श्रेयस हॉस्पिटल शेजारील झोपडीतून गांजाची विक्री होत असल्याची माहिती नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित परिसरावर लक्ष ठेवून कारवाईची तयारी केली.

New Panvel ganja seizure
Mahad Industrial Safety: महाडमध्ये कामगार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मंगळवारी अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचत गांजा विक्री करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी झोपडपट्टीतील एका घराची तपासणी केली असता तेथून सुमारे ६०० ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत लाखो रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दोन्ही आरोपींविरोधात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या गांजाच्या विक्रीच्या मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.

श्रेयस हॉस्पिटलसारख्या वर्दळीच्या ठिकाणाजवळच गांजाची विक्री होत असल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, परिसरात अशा प्रकारच्या कारवायांवर सातत्याने लक्ष ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

New Panvel ganja seizure
Mahad Indo Amines Gas Leak: महाड वायुगळतीप्रकरणी एमपीसीबीच्या भूमिकेकडे लक्ष; परिसरातील झाडे भरपावसातही झाली पिवळी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news