

श्रीकृष्ण बाळ
महाड: महाड औद्योगिक क्षेत्रातील इंडो अमाईन्स कंपनीत शनिवारी झालेल्या वायुगळती प्रकरणात कंपनी प्रशासनाने कामगारांवर उपचार करताना दिलेली प्राथमिक माहिती चुकीची असल्याचा आरोप होत आहे.
अपुऱ्या व चुकीच्या माहितीमुळे उपचारात अडचणी निर्माण होऊन दोन कामगाराचा मृत्यू झाल्याची तीव्र भावना कामगार आणि स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.दरम्यान कंपनी परिसरातील झाले वायू गळतीमुळे भरपावसात पिवळी पडली आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) या प्रकरणात कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून सुरुवातीला गळती झालेला वायू हायड्रोक्लोरिक ॲसिड असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात गळती झालेला वायू वेगळाच असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संवेदनशील विषयावर इंडो अमाईन्स कंपनी व्यवस्थापनाकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा किंवा स्पष्टीकरण आलेले नाही.
भर पावसात झाडे झाली पिवळी
वायुगळतीच्या दुसऱ्या दिवशी कंपनी परिसरात पाहणी केली असता, कंपनीसमोरील झाडे आणि रानफुले भर पावसात पिवळी पडल्याचे दिसून आले. या वायूचा परिणाम वनस्पतींवर झाला असल्यास, भविष्यात मानवी आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बाधित कामगारांची सखोल वैद्यकीय तपासणी करावी आणि झाडांची पाहणी करून तपास करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
प्रदूषण मंडळाकडून पारदर्शक चौकशी आणि कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रणासाठी कायदेशीर अधिकार असलेले प्राधिकरण आहे. अशा आपत्कालीन स्थितीत:चुकीची प्राथमिक माहिती दिल्याप्रकरणी कंपनी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून चौकशी व्हावी.
घटनास्थळावरून घेतलेल्या हवेच्या व इतर नमुन्यांचे निष्कर्ष जाहीर करावेत.भविष्यात अशा घटना घडल्यास अचूक माहिती देण्यासाठी काय खबरदारी घेतली जाईल, याचे स्पष्टीकरण कंपनीकडून घेतले जावे. आरोग्य व सुरक्षिततेशी थेट संबंधित असलेल्या या प्रकरणात प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ सुधारित माहिती न देता पारदर्शक पद्धतीने सत्य समोर आणावे, अशी मागणी जोर धरत आहे.
वायू गळतीचा झाडांवर परिणाम
वायुगळतीच्या दुसऱ्या दिवशी कंपनी परिसरात पाहणी केली असता, कंपनीसमोरील झाडे आणि रानफुले भर पावसात पिवळी पडल्याचे दिसून आले. या वायूचा परिणाम वनस्पतींवर झाला असल्यास, भविष्यात मानवी आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.