Neral Valmikinagar bridge : नेरळ-वाल्मिकीनगर येथील पूल वाहतुकीस बंद

नवीन पुलाचे बांधकाम कधी होणार; नागरिकांचा सवाल
Neral Valmikinagar bridge
नेरळ-वाल्मिकीनगर येथील पूल वाहतुकीस बंद pudhari photo
Published on
Updated on

नेरळ : आनंद सकपाळ

कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील नेरळ- वाल्मिकी नगर येथील असलेल्या ब्रिटीश कालीन पुलाचा मधला ठेव्याचा ओढ्यातील पाण्याच्या होणाऱ्या माऱ्यामुळे दगडी धासळल्यामुळे सध्या वाहतूकीसाठी पूल धोकादायक झाल्याने बंद करण्यात आला आहे. या पूलाच्या जागी नवीन पूलाचे काम संबधित विभागाकडून केले जाणार का? असा सवाल हा नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

कर्जत तालुक्यातील कर्जत - कल्याण असलेल्या मुख्य राज्यमार्ग असलेल्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत यांच्या माध्यमातून करण्या आले आहे. तर कर्जत -कल्याण राज्यमार्गावरील नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ पोलीस ठाणे व वाल्मिकी नगर येथे ब्रिटीश कालीन असलेल्या दोन्ही पुलाचे बांधकाम हे नेरळ मधील राहाणार जुने ठेकेदार हनिप करीम सय्यद यांनी बांधकाम केले होते.

Neral Valmikinagar bridge
Raigad News : गिरणे गावच्या चवळीची चव संपूर्ण महाराष्ट्रात

या पुलांच्या दोन्ही कामाला साधारण 45 ते 50 वर्ष झाली असताना व या राज्य मार्गाचे चौपदरीकरणाचे काम हे मंजूर असताना, मात्र संबंधित ठेकाप्राप्न ठेकेदाराकडून या दोन्ही जुन्या पुलांचे शेजारी दोन नविन पुलांचे बांधकम केले आहे. मात्र या जुन्या पुलांचे काम हे करण्यात आले नाही. पावसाळ्यामध्ये माथेरानच्या डोंगर रांगातून प्रचंड प्रमाणात प्रचंड वाहाणाऱ्या पाण्याच्या लोढयांचा या ब्रिटीश पुलांच्या दगडी बांधकांमाचे ठेवे हे गेले 45 ते 50 वर्ष सामना करीत तग धरून होते.

Neral Valmikinagar bridge
Christmas celebrations : प्रभू येशूच्या जन्मोत्सवासाठी मिनी गोवा, अर्थात वसई शहर सजले

या दोन पुलांपैकी नेरळ वाल्मिकीनगर येथी जिर्ण पुलाच्या मधल्या दगडी बांधकामाच्या ठेव्याच्या दगडी पाण्याच्या लोंढयामुळे निखळून पडली. हा पूल तात्काळ वाहतूकीसाठी बंद करून शेजारी बांधण्यात आलेला नवीन पूलावरील पार्किंग केलेल्या बंद गाडया तात्काळ हटवून, सदर नवीन पूल हा वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. मात्र या नविन पूलवरून जाणाऱ्या अवजड वाहानांमुळे दोन वाहाने पास होत नसल्यामुळे मात्र या ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे वाहानचालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

या बंद पुलाच्या ठिकाणी नवीन पूलाच्या बांधकामाला आता झालेल्या हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळाली आहे. सध्या तांत्रिक मंजुरीसाठी असुन, तांत्रिक मंजुरीनंतर वर्कऑडर होताच या नवीन पुलाचे काम सुरू केले जाईल. या पुलाचे काम हे कर्जत सार्वजनिक विभागाकडे वर्ग केले जाईल.

नरेश पवार, उप अभियंता, सा.बां. विभाग, उरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news