Girne village chavli popularity
गिरणे गावच्या चवळीची चव संपूर्ण महाराष्ट्रातpudhari photo

Raigad News : गिरणे गावच्या चवळीची चव संपूर्ण महाराष्ट्रात

ओलावा, दवबिंदूंवर पारंपरिक पद्धतीने पिकणारी चवळी चविष्ट
Published on

तळा : संध्या पिंगळे

तळा तालुक्यातील खाडी किनारी असणाऱ्या गिरणे गावची चवळी आता महाराष्ट्रात प्रसिद्धीस येत आहे. अनेक ठिकाणावरून आतापासूनच येथील या चळवळीला व्यापाऱ्यांकडून मागणी होताना पहावयास मिळत आहे. खाडी किनारी असणाऱ्या या गावातील शेतकरी वर्ग गेल्या अनेक वर्षांपासून पारंपारिक पध्दतीने चळवळीचे पिक काढले जात होते. त्यात आता तंत्रज्ञानाचा ही वापर होत आहे तर काही शेतकरी पारंपारिक पध्दतीने शेती करत आहेत.

कृषी विभागाचेही मार्गदर्शन चवळी पिक घेताना येथे घेतले जात आहे. आता चवळी पिक भहरास आले असून चांगल्या प्रकारे चवळीचे पिक मिळेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे. प्रत्येक शेतकरी अंदाजे दहा मण तर काही पाच मण असे चळवळीचे पिक घेत आहे. या पुर्वी एक खंडी पर्यंतही पिक काही शेतकऱ्यांनी घेतल्याचे येथील शेतकरी म्हणत आहेत.

Girne village chavli popularity
Mumbai News : रंगीत पणत्यांनी साकारली भारतमातेची भव्य कलाकृती

यावेळी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की आमच्या गावचे ग्रामदैवत आई गिरण माऊलींच्या कृपेने आमचे गाव चळवळीसाठी आजपर्यंत प्रसिद्धीस आहे. आम्ही आजही चवळी पिक चांगल्या पध्दतीने घेत आहोत. मागणीही आतापासून होत आहे. यावर्षी चांगले पिक मिळेल अशी अपेक्षा आहे.

तालुक्यात अनेक गावांतून स्थलांतर झाले असले तरी तालुक्यातील एकमेव गिरणे गावातून स्थलांतर कमी झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. शेती, व्यापार, धंदा, व्यवसाय स्थानिक पातळीवर करून चांगले उत्पन्न मिळविले जात आहे. शाश्वत असा शेतीतून चवळीचे पिक घेतले जात आहे.

Girne village chavli popularity
Christmas celebrations : प्रभू येशूच्या जन्मोत्सवासाठी मिनी गोवा, अर्थात वसई शहर सजले

गिरणे गावातून स्थलांतर कमी

तालुक्यात अनेक गावांतून स्थलांतर झाले असले तरी तालुक्यातील एकमेव गिरणे गावातून स्थलांतर कमी झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. शेती, व्यापार, धंदा, व्यवसाय स्थानिक पातळीवर करून चांगले उत्पन्न मिळविले जात आहे. शाश्वत असा शेतीतून चवळीचे पिक घेतले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news