

वसई : अनिलराज रोकडे
भारतात गोव्याच्या खालोखाल ख्रिसमसला बहर येतो तो मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईत ! भिवंडी, वाडा पासून ते वसई आणि पालघर डहाणूपर्यंत पसरलेल्या वसई ख्रिस्ती धर्मप्रांतात एकूण ३६ धर्मग्रामातून नाताळचा हा उत्सत्र केवळ ख्रिस्ती नव्हे, तर राष्ट्रीय सण म्हणून सर्वधर्मीय साजरा करतांना दिसतात.
पुरातन चर्च व नवीन चर्चना रंगरंगोटी व रोषणाई केली आहे. तर घरोघरी आकाशकंदील, लाईटिंग करून, आज, बुधवार, दि. २४ डिसेंबर च्या मध्यरात्री होणाऱ्या प्रभू येशूच्या जन्माची बाट पहिली जात आहे. सायंकाळी अनेक चर्वेस मधून सायंकाळी ७, ८ आणि रात्री ९ वाजता नाताळच्या खास मिस्सा (प्रार्थना) अर्पण केल्या जातील, दि. २५ डिसेंबर, गुरुवारचा दिवशी एकमेकांच्या भेटीगाठी आणि शुभेच्छाच्या देवाण-घेवाण नि आनंदाच्या हिंदोळ्यावर सर्व रममान झालेले असतील.
वसई पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव वास्तव्यास आहेत. धर्मीय रूढी परंपरा जपतानाच येथील तरुण सामाजिक बांधिलकी जपत आहे. यंदा पूर्ण उल्लास अणि जल्लोषात वसईचा नाताळ साजरा होतांना दिसतो आहे. घरोघरी उत्सवाची रंगत आली असल्याचे दिसून येत आहे. वसईशहरातील रंग रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईने घरे, बंगले नि चर्चेस उजळले आहेत.
घरगुती गोडधोड मिष्टांत्र आणि फराळाचे विविध पदार्थ, तथा केक देखील तयार करण्यात आले आहेत. विरारजवळील नंदाखाल येथील चर्च हे १५७३, वसई पापडी १५८२, निर्मळ १५५६ तर सांडोर हे १५६८ सालची वास्तू आहेत. वसई गाव, गिरिज, रमेदी, सांडोर, होळी, भुईगाव, गास, निर्मळ, वाघोली, सोपारा, उमराळे, बोळींज, आगाशी, कोफराड, नंदाखाल, बटार, देवतलाव, नानभाट आदी परिसरातील चर्चेसना नाताळ निमित्ताने नवा बहर आलेला आहे.
येथील प्रत्येक घरातून उच्व शिक्षण घेणारे नागरिक हे परदेशात नोकरीसाठी असले तरी नाताळ सणाला न विसरता एकत्र येतात हे विशेष! वसईत नाताळ सणातील रमेदीच्या घोगळेवाडीतून प्रचंड प्रतिसादाने निघणारी वसई ख्रिसमस कार्निवल मिरवणूक यंदा रद्द झाली असली, तरी इतर निघणाऱ्या गांव स्तरावरील छोटया मोठ्या कार्निवल मिरवणुका निघण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
वसईतील नोकरी उद्योगासाठी परदेशात राहणाऱ्या ख्रिस्ती धार्मियांची संख्या मोठी असून, मात्र नाताळाला हे सर्व जण मायदेशी, अर्थात वसईत येतात. अनेक घरातून वसईचा नाताळ अनुभवायला सोबत परदेशी पाहणे आलेले दिसतात. राहणीमानाने काहीसा आधुनिक असलेला ख्रिस्ती बांधव आणि भगिनी नटून थटून विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
आनंदाच्या हिंदोळ्यावर सर्व रममान होणार
वसई तालुक्यातील सर्वधर्मीय बांधवासाठी स्टेला येथील "विशप्स हाऊस" मध्ये सालाबादप्रमाणे दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आर्चबिशप थॉमस डिसोजा यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रार्थना होत आहे. यावेळी आजी-माजी आमदार, खासदार आणि विविध धर्मीय नेते उपस्थित राहणार आहेत. नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यास वसईकर सज्ज झाले असून, येणारे दोन दिवस एकमेकांच्या भेटीगाठी आणि शुभेच्छाच्या देवाण घेवाण नि आनंदाच्या हिंदोळ्यावर सर्व रममान होणार आहेत.