Murud Janjira Fort : मुरुड जंजिरा किल्ल्याची सफाई नाही

किल्ला पर्यटकांसाठी खुला करणार्‍यास उशीर
Murud Janjira Fort
Murud Janjira Fortpudhari photo
Published on
Updated on

मुरुड जंजिरा : मुरुडचा जंजिरा किल्ला पावसाळ्यात समुद्र खवळल्याने व वादळी वार्यामुळे पर्यटकांसाठी २५ मेला बंद केला जातो. साधारण १ ऑगस्‍टला मासेमारी बोटी सुरु होतात. जंजिरा किल्ल्यात जाणाऱ्या १५ ऑगस्‍टपर्यंत सुरु होणे अपेक्षित आहे. मुरुडला पाऊस सुरु असल्याने जंजिरा किल्ल्यात मोठ्याप्रमाणात झाडी वाढल्याने किल्ला फिरणे पर्यटकांसाठी धोकादायक आहे. 

जर १५ ऑगस्‍टपर्यंत किल्ला पर्यटकांसाठी खुला करायचा असेल तर पुरातत्व खात्याने १५ दिवस अगोदर किल्ला सफाईचे काम सुरु करणे अपेक्षित आहे. परंतु अजूनही पुरातव खात्याच्या अधिकार्‍यांनी कामाला सुरवात केलेली नाही. सप्टेंबर महिना सुरु झाला सफाईचे काम कधी होणार असा प्रश्‍न निर्माण झालेला असाताना पुरातत्व खात्याचे अधिकारी-बजरंग येलीकर म्हणाले पाऊस थांबला कि सफाईचे काम सुरु होईल त्यानंतर किल्ला सुरु होईल पण दर रविवारी पर्यटक यतेतत जंजिरा किल्ला बाहेरून पाहून नाराज होऊन निघून जातात.

Murud Janjira Fort
Mahad Road Condition : महाड तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा

मुरुड जंजिरा येथील आर्थिक विकास पूर्णतः पर्यटनावर अवलंबून आहे, त्यासाठी जंजिरा किल्ला हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे .जंजिरा किल्ल्याची समुद्राच्या लाटांनी अनेक बुरुजाला मोठी भगदाडे पडलीत. आता या पावसात तलावासमोरील दरवाजा पडला व दुरुस्तीची मागणी आम्ही नेहमीच करतो परंतु गर्ली १५ वर्षात एकदाही किल्याचे बुरुज दुरुस्तीला निधी आला नाही असे अधिकरी सांगतात.

Murud Janjira Fort
Goa Mhadei dispute-म्हादईबाबत कोणतीही तडजोड नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news