Raigad Crime : मुरुडमध्ये चरस, एमडी ड्रग्ज जप्त; एकाला अटक

तीन दिवसांची पोलिस कोठडी
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

मुरुड जंजिरा : मुरुड शहराला लागून असणाऱ्या सर सिद्धी अहमद खान यांच्या राजवाड्यानजिक दोन आरोपींना चरस व एमडी ड्रग् सहित अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन आरोपींपैकी एक आरोपी हा अल्पवयीन असून त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी महेश चव्हाण हा म्हसळा येथील राहाणार असून त्यास न्यायालयासमोर हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सूनावण्यात आली आहे.

Crime News
Varnai Mata Temple : पांडवकालीन वरणाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

मुरुड शहर नजीक असणाऱ्या सर सिद्धी अहमद खान यांच्या ऐतिहासिक राजवाड्यात लोखंडी तार कंपाऊंड फाकवून या राजवाड्याच्या अंतर्गत भागात प्रवेश केला. हे दोन तरुण काळया रंगाची स्कॉर्पिओ घेऊन आले होते व नशेत बेधुंद झाले होते. नवाबांचा राजवाडा ही खाजगी मालमत्ता असून कोणाची ही परवानगी न घेता राजवाड्याच्या आतील भागात या दोघांनी प्रवेश केला होता.

Crime News
Sahil Wakode Death Case : साहिलच्या मृत्यूप्रकरणी बाह्यसमितीच्या मागणीवर आंदोलक ठाम!
  • वेळीच मुरुड पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात जाऊन तपासणी केली असता त्यांच्याकडे ३ ग्राम चरस व १,८७० मिलिग्राम एम. डी. जप्त करण्यात आले. तसेच त्यांच्याकडे असणारी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ एम एच ०६ सीएल २७६५ ही सुद्धा जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याकडे असणारे फोन जप्त करण्यात येऊन एकूण १० लाख ४६ हजार ४३५रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news