Sahil Wakode Death Case : साहिलच्या मृत्यूप्रकरणी बाह्यसमितीच्या मागणीवर आंदोलक ठाम!

चलो आयआयटी; विविध विद्यार्थी संघटनांचा सहभाग
Sahil Wakode Death Case
मुंबई : आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलिसांचा असा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.(छाया : दीपक साळवी)
Published on: 
Updated on: 

मुंबई : साहिल वाकोडे मृत्यूप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी संस्थेच्या बाहेरील स्वतंत्र समिती नेमावी आणि प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना निलंबित करावे, या मागण्या करत विविध सामाजिक व विद्यार्थी संघटनांनी बुधवारी ‘चलो आयआयटी’ आंदोलन केले. आंदोलकांनी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बुधवारी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांसह खासगी सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वार परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली होती.

Sahil Wakode Death Case
Mumbai Crime : पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला अटक

प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांच्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करावे. साहिलच्या परीक्षेतील कथित गैरप्रकाराबाबत प्रसारमाध्यमांमध्ये माहिती प्रसारित करण्यापूर्वी पुरेशी पडताळणी करण्यात आली नव्हती. संस्थेने यापूर्वी दिलेल्या निवेदनाबद्दल साहिलच्या पालकांची माफी मागावी, विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊ नये, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

या आंदोलनात दलित पँथरचे सहसंस्थापक ज. वि. पवार, वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, शरद पवार गटाचे अनिश गवांदे आणि प्रीतिक नांदगावकर, लोकशाहीर संभाजी भगत, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे राहुल सोनपिंपळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे सुनील निर्भवणे, भीम आर्मीचे अशोक कांबळे, दलित लेखिका व कार्यकर्त्या उर्मिला पवार आणि दलित कार्यकर्त्या अशालता कांबळे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Sahil Wakode Death Case
Mumbai FDA Action : मुंबईत डॉमिनोजसह १७ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

आमची लढाई, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, डॉक्टर आंबेडकर मेडिकल असोसिएशन, मुंबई, प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स युनियन आणि छात्र भारती या संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news