Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर 32 तास वाहतूक ठप्प; सुविधा नाही, तरीही टोल वसुली

प्रोपेलीन गॅस टँकर अपघातानंतर प्रवाशांचे हाल; टोल परत न दिल्यास मनसेचा ‘खळखट्याक’ इशारा
Mumbai Pune Expressway
Mumbai Pune ExpresswayPudhari
Published on
Updated on

खोपोली : प्रशांत गोपाळे

गेल्या मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रोपेलीन गॅस टँकर उलटल्याने वाहतूक कोंडी झाली होती. एक्सप्रेस वेवरील पुणे लेन 31 तास बंद ठेवण्यात आली होती.यामधे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.एमएसआरडी आणि आयआरबी कडून कुठल्याही प्रकारची मदत किवा सुविधा प्रवाशांना देण्यात आली नाही. उलट त्याच प्रवाशांकडून टोल वसुली केली आहे. ही केलेली टोल वसुली लवकरत लवकर प्रवाशांना परत करावी व एक्सप्रेसवेवर प्रवाशांना सुविधा द्याव्यात अशी मागणी मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष आरिफ शेख यांनी करुन आयआरबी प्रशासनाला आज निवेदन दिले.

Mumbai Pune Expressway
Navi Mumbai Mayor Election: नवी मुंबई महापालिकेच्या 13व्या महापौरपदी सुजाता पाटील; भाजप सभागृहात नाराजीचे सूर

घेतलेले टोलचे पैसे परत दिले नाहीत तर मनसे स्टाइलने खळखट्याक आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी मनसे कार्यकर्त्यानी दिला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी सायंकाळी पुण्याकडून मुंबईकडे जाणार हा टँकर बोरघाटामधील आडोशी बोगद्याजवळ पलटी झाल्याने मोठा अपघात घडला.

Mumbai Pune Expressway
Eknath Khadse Bhosari land scam: भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा धक्का; अजामीनपात्र वॉरंट जारी

या अपघातात टँकरमधील प्रोपेलीन हा घातक वायू लिक झाल्याने पुढील धोका टाळण्यासाठी एक्सप्रेसवेवरील वाहतूक थांबविण्यात आली होती. हे लिकेज थांबविण्यासाठी यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करीत होती, मात्र हे लिकेज थांबविण्यात प्रशासनाला अपयश आल्याने तब्बल 32 तास वाहतुक कोंडी मध्ये प्रवासी वाहने अडकून पडली होती. प्रवासी वर्गाला हाल सहन करावे लागले. तरीही आयआरबीच्या टोल नाक्यावर टोल वसूल करण्यात आला. त्यामुळे कोणतीही सुविधा न देता टोल वसुली कशी काय केलीत याचा जाब विचारण्यासाठी मनसे सेना वाहतूक सेनेचे आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन आज करण्यात आले. यावेळी हेमंत पाटील ,प्रदीप वाघमारे,माऊली थोरवे,अभिषेक दर्गे,महेश सोगे यांच्यासह शेकडो मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. घेतलेले टोलचे पैसे परत दिले नाहीत तर मनसे स्टाइलने खळखट्याक आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी मनसे कार्यकर्त्यानी दिला आहे.

Mumbai Pune Expressway
BMC Mahayuti: मुंबई पालिकेत शरद पवार गटाच्या एकमेव नगरसेवकाचा शिवसेनेला पाठिंबा, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

13 फेब्रुवारी रोजी बैठक होणार

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर टँकर पलटी झाल्याने 32 तास वाहतूक ठप्प होती. या घटनेची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार शुक्रवारी मनसे कार्यकर्ते आक्रमक होऊन आयआरबी प्रशासनाला जाब विचारीत कोणत्याही प्रकारे सुविधा न देता वाहतूक कोंडी मध्ये अडकलेल्या वाहनांकडून टोल वसुली केलीत, ती रक्कम परत करा आणि महामार्गावर सुविधा उपलब्ध करा असे निवेदन दिले आहे.याबाबत 13 फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे जर का या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मनसे स्टाईलने आम्ही उत्तर देणार आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news