पेण : कमलेश ठाकूर
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम 14 वर्षांपासून रखडले आहे. महामार्ग 2025 मध्ये तरी पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र महामार्गावरील प्रचंड प्रमाणात असणारे खड्डे, अजूनही बाकी असणारे ओव्हरब्रिज, सर्व्हिस रोड हे पाहता पुन्हा पुढील वर्षही महामार्गाची रडकथा सुरूच राहील, असे चित्र दिसत आहे. महामार्गाचे अजून 30 टक्के काम बाकी आहे.
पळस्पे ते बांदा सिंधुदुर्ग अशा प्रवासात अजूनही बऱ्याच गावांना जोडणारे सर्व्हिस रोड जसंच्या तसेच आहेत. तेथे सिमेंटचा रस्ता झालेला नाही. तीच अवस्था ओव्हरब्रिज बाबत आहे. अजूनही मोठे ओव्हरब्रिज होणे बाकी आहे. यात नागोठने, कोलाड, इंदापूर, चिपळूण संगमेश्वर अशा ठिकाणची ओव्हरब्रिज व्हयला अजून सात आठ महिने लागू शकतात. एव्हढे काम बाकी आहे.
इंदापूर ते माणगाव या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी दररोज होत असते. यासाठी बायपास मार्ग संपादन करण्यात आले. मात्र या कामाला अजून सुरुवातही झाली नाही. त्या रस्त्यावरील ओव्हरब्रिज, नदीवरील ब्रिज केव्हा बांधला जाणार याबाबत रस्ते आभियंता सुद्धा अनभीज्ञ आहेत.
महामार्ग वर मधोमध झाडे लावणे बंधनकारक असले तरी अभियंतानी मात्र याकडे दुर्लक्षच केले आहे. अजूनही 80 टक्के वृक्ष लागवड केलेलीच नाही. यामुळे महामार्गावर प्रवास करताना कुठेही सावली आढळून येत नाही. याचबरोबर केवळ पाच ते दहा टक्के महामार्गावर पथदिवे यांचे खांब लावण्यात आले आहेत, मात्र हे पथदिवे अजून सुरू झालेले नाहीत तर काही ठिकाणी पथदिव्यांचे खांब सुद्धा लावलेले नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळेस प्रवास करताना स्वतःच्या गाडीच्या उजेडावरच प्रवास करावा लागतो यातून अनेकदा अपघात घडलेले आहेत.
पळस्पे ते बांदा सिंधुदुर्ग अशा 490 किलोमीटरच्या प्रवासात अजूनही 50 टक्के ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत यामुळे वाहन चालकांना कोणत्या ठिकाणावरून डावीकडे जावे की उजवीकडे जावे असा प्रश्न पडतो.
2025 हे वर्ष संपायला आता केवळ दोन महिने उरले आहेत. पावसाळा संपल्यावर ऑक्टोबरपासून पर्यटक महामार्गावरील समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात मात्र महामार्गाची ही खड्डेमय अवस्था आणि लागणारा वेळ होणारी वाहतूक कोंडी हे पाहिल्यानंतर पर्यटक पुन्हा त्या मार्गावरून प्रवास करण्यासाठी सहजासहजी तयार होत नाहीत. यामुळे शेकडो व्यावसायिक व पर्यटनावर आधारित धंदेही या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे सुरळीत होत नाहीत. 2025 उजाडल्यानंतरही पुढील सात-आठ महिने ही कामे चालूच राहतील, सर्विस रोड ओवर ब्रिज काम पूर्ण होण्यास अजून सहा सात महिने लागणार हे निश्चित आहे त्यामुळे महामार्गाची अवस्था सध्या तरी खड्ड्यातूनच जाणारी असेल असे चित्र दिसत आहे.
महामार्गाचे काम 60 टक्केपर्यंत पूर्ण झालेले दिसत आहे. अजूनही महामार्गाच्या बाजूला असणारे सर्विस रोड हे खड्ड्यांनी भरलेले आहेत, तर महामार्गावर अजूनही पथदिवे नाहीत तर दोन रस्त्यांमध्ये असणारी झाडेही दिसत नसल्याचे खंत त्याने व्यक्त करतानाचं प्रत्येक खड्ड्याचे गुगल मॅप द्वारे फोटो काढून महामार्ग अभियांत्यांना पाठ्वले आहेत. मात्र याबाबत गांभीर्यता दिसत नसल्याचे खंत त्यांनी व्यक्त केली.
युवकाचा पाचशे किमी चालत प्रवास
मुंबई-गोवा महामार्गाचे गेले 13 वर्ष सुरू असणारे विस्तारीकरण आतापर्यंत किती झाले आहे, या महामार्गावर अजूनपर्यंत किती खड्डे आहेत, किती ओव्हरब्रिज होणे बाकी आहे, अजूनपर्यंत किती सर्विस रोड होणे बाकी आहे, अशा प्रकारची एकूणच महामार्गाची दशा पाहण्यासाठी पेण तालुक्यातील पाटणी गावाचा चैतन्य लक्ष्मण पाटील हा युवक पळस्पे -पनवेल येथून बांदा सिंधुदुर्ग अशी महाराष्ट्राच्या शेवटच्या बॉण्ड्रीपर्यंत 29 दिवस पायी चालत राहिला.