मुंबई : मध्य रेल्वने रविवारी ( 26 ऑक्टोबर) रोजी माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 पासून 15.45 वाजेपर्यंत उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे.
डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकात डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि गंतव्य स्थानावर साधारणतः 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकात पुन्हा डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील.
गाड्या मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या मुलुंड ते माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र ब्लॉक नाही.
ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर 11.10 पासून ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत रेल्वेसेवा बंद राहतील. ठाणे येथून सकाळी 10.35 वाजल्यापासून ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन मार्गावरील गाड्या तसेच पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी 10.25 वाजल्यापासून ते दुपारी 4.09 वाजेपर्यंत ठाण्याकडे येणाऱ्या अप मार्गावरील गाड्या रद्द राहतील.