Mumbai Goa Highway Accident |मुंबई-गोवा महामार्गावर अमोनिया गॅसचा टँकर पलटी; गॅसगळती टळल्याने मोठा अनर्थ टळला

कशेडी बोगद्यासमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी
Kashedi Ghat Ammonia Gas Tanker Overturns
Kashedi Ghat Ammonia Gas Tanker OverturnsPudhari
Published on
Updated on

Kashedi Ghat Ammonia Gas Tanker Overturns

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वरील कशेडी बोगद्यासमोर  अमोनिया गॅसची वाहतूक करणारा टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. सुदैवाने टँकरमधून कोणत्याही प्रकारची गॅसगळती झाली नाही. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

माहितीनुसार, अलिबाग येथून लोटे एमआयडीसीतील प्रेरणा केमिकल्स कंपनीकडे अमोनिया गॅस घेऊन जाणारा टँकर मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाला होता. कशेडी बोगद्यासमोर आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्यावर पलटी झाला.

Kashedi Ghat Ammonia Gas Tanker Overturns
Mumbai-Goa highway accident: मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ कार आणि दुचाकीचा अपघात; दोघे जखमी

टँकरमध्ये अमोनियासारखे धोकादायक रसायन असल्याने काही काळ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या संबंधित यंत्रणांनी आणि कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी टँकरची तपासणी केली असता कोणतीही गॅसगळती झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रशासनासह स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस, महसूल प्रशासन आणि अन्य संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेच्या दृष्टीने परिसराची पाहणी करण्यात आली तसेच महामार्गावरील वाहतुकीचे नियोजन करण्यात आले.

Kashedi Ghat Ammonia Gas Tanker Overturns
Mumbai Goa Highway: कोकणवासियांच्या प्रवासातील मोठा अडथळा दूर; माणगाव बाह्यमार्ग गणेशोत्सवापूर्वी होणार खुला

या अपघातात टँकर चालक प्रेमप्रकाश भस्कळ पटेल (वय ४२, रा. कमळानगर, जास्मिन रोड, ग्रेटर मुंबई) यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना तातडीने कळंबणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, लोटे एमआयडीसीतील संबंधित कंपनीचे सुरक्षा अधिकारी आणि प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टँकरची सखोल तपासणी करून अमोनिया गॅसची कोणतीही गळती झालेली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच नागरिकांना किंवा परिसराला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले.

Kashedi Ghat Ammonia Gas Tanker Overturns
Mumbai Goa Highway Flood | मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पूरस्थिती; २४ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प

त्यानंतर अपघातग्रस्त टँकर सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला हलविण्यात आला आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत करण्यात आली. प्रशासनाच्या तत्पर उपाययोजनांमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली असून या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा पर्यावरणीय हानी झाली नाही. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news