Mumbai-Goa highway accident: मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ कार आणि दुचाकीचा अपघात; दोघे जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर प्रभात नगर येथे दुचाकी आणि कार यांच्यात अपघात होऊन कार चालक व दुचाकी चालक यांना गंभीर दुखापत झाली आहे.
Mumbai-Goa highway accident
Mumbai-Goa highway accidentpudhari photo
Published on
Updated on

Mumbai-Goa highway accident

पोलादपूर: धनराज गोपाळ

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर प्रभात नगर येथे दुचाकी आणि कार यांच्यात अपघात होऊन कार चालक व दुचाकी चालक यांना गंभीर दुखापत झाली आहे. सदर घटना बुधवार रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

Mumbai-Goa highway accident
Nashik Accident | भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; चार वर्षांच्या चिमुकल्यासह दुचाकीस्वार जखमी!

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, पोलादपूर येथे आठ दिवसांपूर्वी स्काय वॉक बसवतेवेळी पोलादपूर प्रभात नगर येथे महामार्गावर डिव्हायडर कट करून रस्ता करून देण्यात आला होता. मात्र संबंधीत बांधकाम विभाग यांच्याकडून पुन्हा या ठिकाणी डिव्हायडर न लावता रस्ता मोकळा ठेवल्याने वाहने जा-ये करत होती. त्यामुळे हा अपघात घडला आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.

या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा पाय मोडला असून कार चालक यांच्या कारची एअर बॅग ओपन झाली, त्यांच्या उजव्या कानाला जोरदार फटका बसल्याने गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळतात काळभैरव रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

या विभागातील बहुसंख्य विद्यार्थी महामार्गावरून ये-जा करत असतात. याठिकाणी संबंधित खात्याने तात्काळ डिव्हायडर टाकून रस्ता बंद करण्यात यावा, अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

दीपक उतेकर

Mumbai-Goa highway accident
Sindhudurg Accident : पोलिस कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news