Coconut News : 2026 च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला मान्यता

नारळ उत्पादक कोकणातील 40 हजार नारळ बागायतदारांना होणार लाभ
Coconut News
केंद्र सरकारने २०२५ च्या नारळ पीक हंगामासाठी खोबऱ्याची किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे.(file photo)
Published on
Updated on

रायगड ः सन 2026 हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला (एमएसपी) केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिली आहे. सरासरी गुणवत्तेच्या किसलेल्या खोबऱ्याची किमान आधारभूत किमत प्रति क्विंटल 12,027 रुपये आणि गोटा खोबऱ्यासाठी प्रति क्विंटल 12,500 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. नारळ उत्पादनात अग्रणी असलेल्या कोकणातील 40 हजार नारळ बागायतदारांना याचा लाभ होणार आहे.

Coconut News
Coconut Water : हिवाळ्यात नारळ पाणी पिणे चांगले आहे काय?

शेतकऱ्यांना किफायतशीर किंमत देण्यासाठी, सरकारने 2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केली होती की, सर्व अनिवार्य पिकांसाठी किमान आधारभूत किंमत अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट पातळीवर निश्चित केला जाईल. तौत्के, फयान आणि निसर्ग या तीन चक्रीवादळात कोकणातील नारळ बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर जाहिर झालेल्या आधारभूत दराचा लाभ होवू शकणार आहे.

महाराष्ट्राचा देशातील नारळ लागवड क्षेत्रात 7 वा तर उत्पादनात 9 वा क्रमांक लागतो. राज्यात एकूण नारळ लागवड क्षेत्र सुमारे 43 हजार हेक्टर आहे तर वार्षिक नारळ उत्पादन 20.98 कोटी नग (नारळ) आहे. नारळाची प्रति हेक्टरी सरासरी उत्पादकता 6,670 नारळ नग आहे. कोकणात राज्यातील सर्वाधिक नारळ लागवड क्षेत्र सिंधुदूर्ग जिल्ह्यात 17 हजार 929 हेक्टर आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 8 हेक्टर, रायगडमध्ये 3400 हेक्टर, पालघर मध्ये 3000 हेक्टर आणि ठाणे जिल्ह्यात 1800 हेक्टर आहे.

सन 2026 च्या हंगामासाठीचा किमान आधारभूत किंमत मागील हंगामाच्या तुलनेत किसलेल्या खोबऱ्याची प्रति क्विंटल 445 रुपये आणि गोटा खोबऱ्यासाठी प्रति क्विंटल 400 रुपये वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 2014 च्या विपणन हंगामासाठी किसलेल्या खोबऱ्याची आणि गोटा खोबऱ्यासाठीची किमान आधारभूत किंमत अनुक्रमे 5250 रुपये प्रति क्विंटल आणि 5500 रुपये ठेवली होती. आतापर्यंत त्यामध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. 2026 च्या विपणन हंगामासाठी ही वाढ अनुक्रमे 129 टक्के आणि 127 टक्के वाढ करण्यात आला आहे.

खोबरे उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन

उच्च किमान आधारभूत किंमत नारळ उत्पादकांना चांगले उत्पन्न मिळवून देणार आहे. याशिवाय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नारळ उत्पादनाला असलेली वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना खोबरे उत्पादन वाढवण्याला प्रोत्साहन मिळणार आहे. किंमत समर्थन योजनेअंतर्गत (पीएसएस) खोबऱ्याच्या खरेदीसाठी राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ लिमिटेड (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) केंद्रीय नोडल एजन्सी (सीएनए) म्हणून काम करणार आहेत.

Coconut News
Coconut & heart health : खोबरे आरोग्यदायी की धोकादायक? हृदयासाठी काय योग्य?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news