जितेंद्र आव्हाडांचे महाडमध्ये मनुस्मृती दहन आंदोलन

जितेंद्र आव्हाडांचे महाडमध्ये मनुस्मृती दहन आंदोलन

महाड; पुढारी वृत्तसेवा : नव्या शैक्षणिक आराखड्यातील मनुस्मृतीच्या उल्लेखाला विरोध करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन आंदोलन केले. "मनुस्मृतीमध्ये शूद्र व स्त्री बाबत चुकीच्या पद्धतीने लिखाण केले. त्या संदर्भाला पुन्हा नव्याने जागृत करण्याचे काम राज्य सरकार पाठयपुस्तकातून करत आहे. पुरोगामी देशाला ५ हजार वर्ष मागे नेण्याचे काम सरकार आहे, अशी टीका आव्हाड यांनी सरकारवर केली.

१९२७ साली महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते, त्याचठिकाणी आज जितेंद्र आव्हाड यांनी मनस्मृतीचे दहन केले. मनुस्मृतीतील दोन श्लोक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले जात आहेत. हळूहळू मनुस्मृतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात होईल, असे आव्हाड यावेळी म्हणाले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मिलिंद टिपणीस यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news