Matheran Marriage Issue: माथेरानचा ‌‘नवरा नको ग बाई‌’; उपवर मुलांचं लग्न ठरण्यात समस्या

हिल स्टेशनच्या स्थळांना मुलींचा नकार
Matheran Marriage Issue
Matheran Marriage Issuefile photo
Published on
Updated on

मिलिंद कदम

माथेरान: निसर्गाच वरदान लाभूनही येथील युवा पिढीला मात्र लग्नाळू राहण्याचा शापच निसर्गाने दिला की काय,अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. माथेरानचा नवरा नको ग बाई,अशी भूमिका उपवर मुली घेऊ लागल्याने माथेरानमधील शेकडो लग्नाळू युवक लग्नाविनाच आयुष्य कंठत आहेत.

येथील स्थानिकांना तुम्ही स्वर्गात राहता असे म्हणणारे स्थानिक तरुणांना आपली कन्या देत नसल्याने माथेरानमध्ये अविवाहित तरुणांचा टक्का वाढत आहे त्यामुळेच माथेरान शाप की वरदान असा प्रश्न समोर येत आहे.

Matheran Marriage Issue
Mumbai Crime News: पंजाबहून आणलेल्या विदेशी घातक शस्त्रांसह तिघांना अटक

माथेरान आणि थंड हवेचे ठिकाण याकरिता माथेरानमध्ये अनेक पर्यटक घेत असतात येथील थंड हवेचा आस्वाद घेताना अनेक जण स्थानिकांना तुम्ही स्वर्गात राहत आहे असे सांगतात परंतु या तरुणांना जेव्हा लग्नासाठी मुली बघितल्या जातात तेव्हा माथेरान नको ग बाई हाच स्वर नेहमी कानावर पडत असतो.

त्यामुळे लग्नाचे वय झाले तरी शहरातील अनेक युवक केवळ मुलीच पसंत करत नसल्याने बिनलग्नाचे राहू लागल्याचे विदारक दृष्य दिसत आहे. पर्यटन हाच मुख्य व्यवसाय असल्याने घरातील सर्व पुरुष मंडळी आपल्या व्यवसायामध्ये दंग असतात त्यामुळे महिलांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होते.

Matheran Marriage Issue
Sagargad Fort: ऐतिहासिक सागरगडावरील साखळी विहिरीचे पुनरुज्जीवन; ‌’दुर्गरक्षक‌’च्या शिलेदारांच्या चार महिन्यांच्या प्रयत्नांना यश

येथे कोणत्याही प्रकारचे वाहन सुरू नसल्यामुळे बाहेर फिरायला जाणे म्हणजे एक दिव्यच असतं चालत मंदिरात जाणे म्हणजे पाच किलोमीटरची पायपिट करणे. चालत फिरणे हे आता रुचत नाही.

मुलभूत सुविधांचाअभाव

महत्त्वाचे कारण म्हणजे माथेरानमध्ये महिलांकरिता चूल व मूल हीच संकल्पना सुरू आहे लग्न झाल्यानंतर येथे आल्यावर महिलांना कोणत्याही प्रकारचे मनोरंजनाचे साधन किंवा इतर कोणत्याही प्रकारची साधन उपलब्ध नाहीत जसे शहरांमध्ये संध्याकाळी मॉलमध्ये फेरफटका किंवा सिनेमा पाहणे गार्डनमध्ये फिरावयास जाणे हॉटेलमध्ये जेवणात जाणे यासारखे प्रकार उपलब्ध असतात परंतु माथेरान मध्ये मात्र असे कोणतेही साधन नसल्याने आजकालच्या मॉर्डन जमान्यातील मुली माथेरानमध्ये लग्न जमण्यास नकार देत असतात.

मी माथेरान मधील सुशिक्षित तरुण असून वेल्डिंग च्या व्यवसायात पारंगत आहे, उत्पन्नाच्या बाबतीतही सर्व ठीक असतानाही फक्त माथेरान मध्ये राहतो म्हणून मुली मिळणे कठीण झाले आहे.

- शेखर चव्हाण, उपवर तरुण,माथेरान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news