Mumbai Crime News: पंजाबहून आणलेल्या विदेशी घातक शस्त्रांसह तिघांना अटक

खंडणीविरोधी पथकाची फोर्ट परिसरात कारवाई; तीन पिस्तुले, 45 काडतुसे जप्त
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsPudhari
Published on
Updated on

मुंबई: पंजाबहून विक्रीसाठी आणलेल्या विदेशी घातक शस्त्रांसह जशन प्रितमंगल सिंह, सुखविंदर चंद्रपाल आणि अरबाज अन्वर चौधरी या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन विदेशी पिस्तुले मॅगझीनसह 45 जिवंत काडतुसे जप्त केली आहे.

यातील अरबाज, जशन आणि सुखविंदर यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल असून याच गुन्ह्यांत ते चार वर्षांपासून फरार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Mumbai Crime News
Sagargad Fort: ऐतिहासिक सागरगडावरील साखळी विहिरीचे पुनरुज्जीवन; ‌’दुर्गरक्षक‌’च्या शिलेदारांच्या चार महिन्यांच्या प्रयत्नांना यश

फोर्ट परिसरात काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीनंतर फोर्ट येथील सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळील पी. डिमेलो रोड, ईस्टर्न फ्रिवेकडे जाणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरील उत्तर वाहिनीवर पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री पावणेबारा वाजता तिथे तीन तरुण आले होते.

या तिघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांना तीन विदेशी पिस्तुले, तीन मॅगझीन आणि 45 जिवंत काडतुसे सापडली. चौकशीत त्यांनी घातक शस्त्रे मुंबई शहरात विक्रीसाठी घेऊन आल्याचे सांगितले. त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mumbai Crime News
Kandivali encroachment action: कांदिवलीतील 90 फिट रोड अतिक्रमणमुक्त; 40 दुकानांच्या वाढीव बांधकामांवर अखेर हातोडा

हत्येच्या गुन्ह्यात आरोपी चार वर्षे होते फरार

अरबाज हा राजस्थान तर इतर दोघेही पंजाबच्या पटियालाचे रहिवाशी आहेत. चौकशीत 2022 साली जशन सिंह आणि सुखविंदर चंद्रपाल यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल आहे. ते दोघेही गेल्या चार वर्षांपासून वॉण्टेड होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news