

मिलिंद कदम
माथेरान: माथेरान मधील पावसाळी पर्यटन हंगाम तेजीत सुरू झाला असून या काळात माथेरानमध्ये अनेक पावसाला स्वतःच्या कॅमेरात कैद करण्यासाठी अनेक जण येत असतात व आपला व्हिडिओ सर्वात वेगळा असावा यासाठी काहीही करण्यास तयार असतात त्यामुळे येथील प्रेक्षणीय स्थळांवर सुरक्षा रेलिंग सुस्थितीत असणे गरजेचे आहे. परंतु अनेक ठिकाणी या रेलिंग तुटलेल्या अवस्थेत असल्याने त्याची दुरुस्ती होणे गरजेचे झाले आहे.
माथेरान मधील सर्वात जास्त पर्यटक जात असलेला हा महत्त्वाचा पॉईंट आहे त्यामुळे ही रेलिंग तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे.
येथील लुईझा पॉईंट हा पावसातील सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे येथून शार्लेट लेक च्या धबधब्याचे व मोरबे धरणाचे विहंगम दृश्य टिपण्यास अनेक जण जात आहेत व या ठिकाणी सर्वात जास्त वारा असतो व अनेक अपघात ही याच ठिकाणी घडलेले आहेत.येथील सुरक्षा रेलिंग ही तुटलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे येथील रेलिंग सुस्थितीत असणे गरजेचे आहे.
माथेरान मधील अनेक ठिकाणची सुरक्षा मुद्दा नेहमीच उपस्थित होत असतो त्यामुळे येथील अपघात क्षेत्र व महत्वाच्या ठिकाणी सिसि टीव्ही कॅमेरा बसविण्यात यावेत अशी मागणी नेहमीच करण्यात येत असते.
अनेक प्रेक्षणीय स्थळांवर सेल्फीच्या नादात तरुण वर्ग अगदी कड्याच्या किनाऱ्यावर उभा राहून फोटो काढत असतात त्यामुळे या रेलिंग सुरक्षा माहिती फलक लावून पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी माथेरान पालिकेने तातडीने पावले उचलावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
महत्वाच्या ठिकाणी सुरक्षेचा अभाव
माथेरान मध्ये पावसाला सुरवात होताच येथील पावसाळी पर्यटनाला बहर आला आहे. त्यातच येथील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे ब्लॉगर माथेरानमध्ये येऊ लागले असून येथील काही ठिकाणे त्यांना आकर्षित करीत आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने येथील मिनी ट्रेन, कड्यावरचा गणपती,शार्लेट लेक,लुईझा पॉईंट घाटातील धबधबे,व इतर पॉईंट आहेत येथील सात पॉईंट सर्कल पावसाळ्यात अधिक आकर्षक दिसत असते त्यामुळे तेथेही मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात. परंतु तेथील अनेक ठिकाणच्या सुरक्षा रेलिंग गायब झालेल्या आहेत तर येथील शार्लेट लेक बंधाऱ्यातील रेलिंग तुटलेल्या अवस्थेत आहेत.