Matheran Sports Complex Development: पाच कोटी खर्चूनही माथेरानचं ऑलिंपिया मैदान बकाल; टेनिस क्रिकेट हंगामात क्रीडाप्रेमी संतप्त

वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल अपूर्णच; मूलभूत सुविधांच्या अभावामुळे खेळाडू आणि प्रेक्षक नाराज
Matheran Sports Complex Development:
Matheran Sports Complex Development:Pudhari
Published on
Updated on

माथेरान : मिलिंद कदम

माथेरानचा टेनिस क्रिकेट हंगाम सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुलाच्या बकल पाण्यचा प्रश्न समोर आला असून तब्बल पाच कोटी रुपये खर्च केल्यानंतरही या ठिकाणी सुशोभीकरण्याच्या नावाखाली झालेला पैशाचा चुराडा क्रीडा प्रेमींच्या चर्चेचा विषय झाला असून हे क्रीडा संकुल केव्हा पूर्णत्वास जाणार याबाबत क्रिकेट प्रेमी व खेळाडूंमध्ये त्रिव्र नाराजी भावना दिसून येत आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठे क्रीडा मैदान म्हणून माथेरानचे वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल ( ऑलिंपिया मैदान) हे प्रसिद्ध मैदान असून या मैदानावर जानेवारी पासून मार्च महिन्यापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट सामने आयोजित करण्यात येतात.तर मे महिन्यात अश्व शर्यतीचे आयोजन करण्यात येते.

Matheran Sports Complex Development:
Stray dog attack Neral: नेरळमध्ये भटक्या पिसाळलेल्या श्वानाचा कहर; 9 वर्षीय ऋषिकेशचा उपचारादरम्यान मृत्यू

क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी इथे प्रेक्षकांची मोठया प्रमाणावर गर्दी असते. जवळपास पंचवीस एकरांमध्ये ह्या मैदानाची व्याप्ती असून गावापासून दूरवर हे मैदान आहे. याच मैदानाच्या सुशोभीकरण आणि दुरुस्तीसाठी मागील काळात जवळजवळ पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु अयोग्य नियोजनामुळे ह्या मैदानाच्या विकास कामांचा पुरता बोजवारा उडाला आहे.

स्टेडियम मधील शेडचे पत्रे गायब झालेले असून उन्हाळ्यात प्रेक्षकांना झाडांचा आधार घ्यावा लागत आहे. तर दूरवरून क्रिकेट सामने पाहताना सुध्दा ज्या जांभ्या दगडांचा अनाठायी वापर करून एकप्रकारे या मैदानाला बकालपणा आणलेला असल्याने हे मैदान पूर्णपणे विद्रुप झालेले दिसत आहे.

Matheran Sports Complex Development:
Raigad Water Scarcity: रायगडमध्ये जल जीवन मिशन अपयशी; हजारो कोटी खर्चूनही 1253 गावे पाणीटंचाईच्या छायेत

निदान प्रेक्षकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी स्टेडियम वर पत्रे लावण्यात यावेत जेणेकरून कुणालाही उन्हाच्या झळांना सामोरे जावे लागणार नाही.

प्रेक्षकांना क्रिकेट सामने पाहताना मनसोक्तपणे आनंद घेता येईल यासाठी संबंधित खात्याने याबाबत ठोस उपाययोजना करावी अशी समस्त क्रीडाप्रेमीं मधून मागणी केली जात आहे.या ठिकाणी कायमस्वरूपी विजेची सोय नाही तर शौचालयांची व्यवस्था असावी ही क्रीडा प्रेमींची अनेक वर्षापासूनची मागणी आहे येथे तात्पुरत्या स्वरूपात शौचालय उभी केली गेली आहेत, परंतु त्या ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने घाणीचे साम्राज्य आहे प्रेक्षकांना बसण्याची आसन व्यवस्था कोलमडले असून अनेक वर्षाच्या जुन्या खुर्च्या बसल्यानंतर मोडून पडत आहे. या ठिकाणीमुख्य शेडला पत्रेच नाही, लोखंडी बार हे गंजले असून इतर ठिकाणच्या पॅव्हेलियन शेडचे पत्रे ही कलरच्या प्रतीक्षेत आहे याकडे नगरपालिकेने सबसे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळते.

Matheran Sports Complex Development:
Horse Carriage Pollution Matheran: माथेरानमधील घोड्यांवर नियंत्रणासाठी हरित लवादाची दखल; सुनावणीला दोन आठवड्यांची मुदत

अन्य सुविधांची लवकर पूर्तता होणे गरजेचे

माथेरानचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी तातडीने क्रीडा संकुलाचा नाम फलक बसून घेतला आहे व इतर सोयी लवकरच केली जाईल अशी शाश्वती क्रीडा प्रेमींना दिली आहे. याची पूर्तता लवकरात लवकर व्हावी अशी मागणी, येथे येणारे क्रीडाप्रेमी व खेळाडू यांनी जोर लावून धरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news