Photo of Peerbhoy Matheran railway station : माथेरान रेल्वेस्थानकात पीरभॉय यांचा फोटो

अली अकबर पिरभॉय यांच्या सातत्यपूर्ण पाठपूराव्यास अखेर यश
Photo of Peerbhoy Matheran railway station
माथेरान रेल्वेस्थानकात पीरभॉय यांचा फोटो pudhari photo
Published on
Updated on

माथेरान ः मिलिंद कदम

माथेरान मिनी ट्रेनचे जनक स्वर्गीय आदमजी पीरभॉय व त्यांचे सुपुत्र हुसेन यांचे छायाचित्र माथेरान रेल्वे स्टेशन येथे त्यांनी मिनी ट्रेन साठी दिलेले योगदान पर्यटकांच्या कायम स्मरणात राहावे याकरिता लावले होते परंतु मागील एक वर्षापासून हे चित्र येथून गायब झाले होते व ते चित्र पुन्हा लागावे याकरिता आदमजी पीरभॉय यांचे नातू अली अकबर पिरबॉय हे रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. काल हे चित्र पुन्हा माथेरान स्थानकामध्ये लावले गेल्याने येणाऱ्या पर्यटकांना पिरभॉय यांचा इतिहास वाचावयास मिळणार आहे.

माथेरानच्या पर्यटनामध्ये मिनी ट्रेनचे स्थान अनन्य साधारण आहे कारण माथेरानचे पर्यटन व अस्तित्व खऱ्या अर्थाने मिनी ट्रेन सुरू झाल्यानंतरच बहरले होते या ट्रेन मधून प्रवास करण्याकरिता देश विदेशातून अनेक पर्यटक दाखल होत असतात.माथेरान मिनी ट्रेनचा इतिहास 1907 मध्ये सुरू झाला, जेव्हा नेरळ आणि माथेरान दरम्यान ही हेरिटेज रेल्वे सुरू झाली.

Photo of Peerbhoy Matheran railway station
Raigad News : वधूंच्या वाढत्या अपेक्षांनी वरांचे पालक झालेत हैराण

सर आदमजी पीरभॉय यांनी आपल्या मुलाच्या, अब्दुल हुसैन आदमजी पीरभॉय यांच्या मदतीने या 1904-1907 दरम्यान 16 लाख खर्चूनरेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण केले. ही रेल्वे माथेरानला जाण्यासाठी एकमेव मार्ग प्रदान करते, ज्यामुळे तिचे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व आहे. त्यांनी केलेल्या या कामाचा हवा तसा सन्मान अजूनही झालेला नसल्याची खंत यांचे नातू अली अकबर आदमजी पीरभॉय हे सातत्याने व्यक्त करीत असतात.

Photo of Peerbhoy Matheran railway station
Camphor factory wastewater damage : कापूर उत्पादक कंपनीतील सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

माथेरान स्थानकामध्ये त्यांचे लावलेले चित्र रेल्वे प्रशासनाकडून गहाळ झाल्यानंतर त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला होता. स्वखर्चाने रेल्वे सुरू करणाऱ्या अशा व्यक्तींबद्दल अनादर असल्याचे या प्रकारातून सिद्ध होते असे ते सातत्याने बोलत असत परंतु आता हे चित्र पुन्हा आपल्या स्थानी आल्यानंतर मात्र त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आमच्या आजोबांनी माथेरान पर्यटन वाढविण्याकरिता मिनी ट्रेनच्या मार्फत दिलेल्या योगदानाला हवा तसा सन्मान अजूनही मिळाला नाही माथेरान स्थानकामध्ये त्यांच्या नावाने एक स्मारक व्हावे अशी आम्ही सातत्याने मागणी करत असतो परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

श्री. अली अकबर पिरभॉय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news