Matheran Toilet Construction: माथेरानमध्ये प्रसाधनगृहासाठी 35 लाखांचा खर्च; नगरपरिषद कारभारावर सवाल

अगोदरच दोन शौचालये असताना अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी नवे बांधकाम; स्थानिकांकडून चौकशीची मागणी
Matheran Toilet Construction
Matheran Toilet ConstructionPudhari
Published on
Updated on

माथेरान : मिलिंद कदम

माथेरानमधील नगरपरिषदेच्या आवारात अगोदरच दोन प्रसाधनगृह असताना देखील नवी महागडी प्रसाधनगृह खासकरून अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी बसविण्यात आली आहेत. या दोन शौचालयांच्या बांधकामासाठी तब्बल 35 लाख रुपये खर्च आला आहे. त्यामुळे शौचालयांवर अव्वाच्या सव्वा खर्च करण्याची गरज आहे का? असा सवाल माथेरानकरांकडून उपस्थित केला जात आहे.

Matheran Toilet Construction
Lonere Minor Attacked: लोणेरेत क्रिकेटच्या वादातून 15 वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला; परिसरात खळबळ

प्रशासकीय राजवटीत माथेरानमध्ये जवळपास दहा शौचालये आणण्यात आली आहेत. स्त्री आणि पुरुषांच्या करिता वेगवेगळ्या स्वरूपात असणाऱ्या या दोन शौचालयांची किंमत 35 लाख रुपये असून एवढ्या महागड्या शौचालयांची खरोखरच या दुर्गम भागातील पर्यटनस्थळावर गरज आहे का ? असा प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे. यातील एक शौचालय नगरपरिषदेच्या आवारात याठिकाणी अगोदरच दोन शौचालय असताना देखील नाहक एवढी महागडी शौचालय खासकरून अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी बसविण्यात आले आहे.

Matheran Toilet Construction
Raigad Fort Shivaji Palace Reconstruction: रायगडवरील शिवरायांच्या राजवाड्याची रखडली पुनर्उभारणी

तर काही शौचालये अद्यापही नगरपरिषदेच्या आवारात धूळ खात पडून आहेत. माथेरानमध्ये आजमितीला खर्चिक पर्यटकांचा भरणा होत नाही. पर्यटन कशाप्रकारे वाढेल इथे पर्यटन वाढीसाठी वाहतूक व्यवस्था त्याचप्रमाणे सुस्थितीत रस्ते असावेत, पाणी, वीज सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु प्रशासकीय राजवटीत माथेरान पुढील काही वर्षे पिछाडीवर गेल्याचे बोलले जात आहे. नगरपरिषदेच्या तिजोरीत खळखळाट असून कामगारांना त्याचप्रमाणे लहानसहान कामे करणा-या ठेकेदाराला वेळेवर पगार,बिले मिळत नसल्याच्या तक्रारी येत असतात. एखादया निकृष्ट कामांबाबत केलेल्या कामांची बिले किती अदा केली आहेत. याबाबत कुणी माहितीच्या अधिकारात माहिती मागविल्यास मोगम उत्तरे देऊन कामात चालढकल सुरू असते.मोठया कामातील ठेकेदाराला शुल्लक रक्कमेसाठी अभय दिले जात असून पाठिशी घातले जात आहे, असा आरोप माथेरानकर नागरिक करीत आहेत. दरम्यान नगरपरिषदेच्या अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, संबंधित शौचालयांमध्ये अत्याधुनिक सुविधा असल्याने त्यांचा खर्च अधिक असल्याचे सांगून अधिक बोलण्यास टाळले.

Matheran Toilet Construction
Raigad palace reconstruction | अपुरा सरकारी निधी, ‘पुरातत्त्व’च्या मान्यतेअभावी रखडली शिवरायांच्या रायगडावरील राजवाड्याची पुनर्उभारणी

मुंबई-पुण्यापासून अगदी जवळचं प्रेक्षणीय, वाहनविरहित, सह्याद्रीच्या पर्वतराजीमध्ये समुद्रसपाटीपासून 803 मीटर उंचीवर गर्द हिरव्यागार वनराईची वृक्षसंपदा, पक्षी, प्राणी, फुले, झरे, लालमातीचे रस्ते आणि आपुलकीनं समृद्ध असलेले माथेरान हे देशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

4 फेब्रुवारी, 2003 मध्ये माथेरानला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे इथे बांधकामांवर कठोर निर्बंध घालण्यात आले. हेरिटेज कमिटीची स्थापना करण्यात आली. सुट्टीच्या हंगामात येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

Matheran Toilet Construction
Raigad Ropeway Closed | रायगड रोप-वे दि. २३ ते २८ फेब्रुवारीदरम्यान बंद; पायरी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

सखोल चौकशी करण्याची मागणी

आजवर इथल्या विकास कामांबाबत सकारात्मक कामे न होता सुध्दा लाखो, करोडो रुपयांची बिले अदा करण्यात आलेली आहेत. यामागे कुणाचा वरदहस्त आहे. प्रशासकीय राजवटीत मोठ्या प्रमाणावर अनाठायी खर्च आणि भ्रष्टाचार झाल्याचे नागरिक बोलत आहेत. एकंदरीत माथेरान नगरपरिषदेच्या या कारभाराबाबतीत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई बरोबरच दोषी असणाऱ्या या मंडळींना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news