Pradeep Purnekar Case : फक्त चौकशी... गूढ मात्र उकलेना

पूर्णेकर कुटुंबीय व पूर्णेकर समर्थकांनी पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचा आरोप केला
Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar Case pudhari photo
Published on: 
Updated on: 

नरेंद्र राठोड, ठाणे

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या घटनेला महिना पूर्ण होत आला तरी पोलीस मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे व माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना अटक का करीत नाहीत, असा सवाल पूर्णेकर कुटुंबीय वारंवार करीत आहेत.

ठाण्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या घटनेला एक महिना पूर्ण होत आला तरी या हत्येच्या घटनेमागील नेमके कारण काय, हे शोधून काढण्यात ठाणे पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे पूर्णेकर कुटुंबीय व पूर्णेकर समर्थकांनी पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचा आरोप केला आहे.

Pradeep Purnekar Case
Raigad Crime : रायगडच्या दुर्गम भागातील मोबाईल टॉवर्स लुटणाऱ्या हायटेक टोळीचा पर्दाफाश

ठाण्यातील उबाठा शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात पप्या शिंदे, निखिल यादव, नितेश पवार, संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमित सिंग ऊर्फ पपलू या पाच मारेकऱ्यांना अटक केली आहे. तर या प्रकरणात संशयित असलेल्या राजेंद्र शिंदे यांची सात वेळा पन्नास तासाहून अधिक काळ पोलिसांनी अटकेतील आरोपींच्या समोरासमोर बसवून चौकशी केली आहे. तर राजेंद्र शिंदे यांच्या पत्नी तथा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची देखील मंगळवारपासून चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेत पोलीस चौकशीचा फार्स वाढत आहे, मात्र तरी देखील या हत्याकांडामागील गूढ उकलण्याचा ठाणे पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी तपास करीत असलेले एसआयटी पथक एकीकडे संशयितांची नुसतीच चौकशी करीत असतानाच दुसरीकडे प्रदीप पूर्णेकर यांचे सुपुत्र राम पूर्णेकर यांनी मात्र या गुन्ह्यातील अनेक पुरावे समोर आणले आहेत. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येत सहभागी असलेल्या मारेकऱ्यांमध्ये हेल्मेट घातलेला पाचवा आरोपी राजेंद्र शिंदेच होता, असा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी पूर्णेकर कुटुंबीयांनी काही सीसीटीव्ही समोर आणले आहेत.

Pradeep Purnekar Case
Chhatrapati Sambhajinagar Water conservation Kannad|दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य

ज्यात हत्येतील चारही आरोपी व राजेंद्र शिंदे हे एकत्र वावरतांना व चहा पितांना दिसत आहेत. तर हत्या झाली त्यावेळी हेल्मेटधारी आरोपी व सीसीटीव्हीत दिसत असलेल्या राजेंद्र शिंदे यांचे कपडे व बूट देखील सारखेच असल्याचे पूर्णेकर कुटुंबीयांनी समोर आणलेल्या सीसीटीव्हीत दिसून येत आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला पाचवा आरोपी अमित सिंग उर्फ पपलू हा डमी आरोपी असून मुख्य सुत्रधारांना वाचवण्यासाठीच हा सारा बनाव रचण्यात आल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. सीसीटीव्ही व इतर कुठल्याही व्‍हीडिओत अमित सिंग दिसत नाही. राजेंद्र शिंदे मात्र इतर चार आरोपींसोबत वारंवार दिसून आले आहेत.

त्यामुळे पाचवा आरोपी हा राजेंद्र शिंदेच होता, असा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस आरोपींना पाठीशी घालत असून ठाण्यातील सत्ताधारी नेत्याच्या दबावाखाली पोलीस तपास सुरू असल्याचा गंभीर आरोपही पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या घटनेला महिना पूर्ण होत आला तरी पोलीस मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे व माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना अटक का करीत नाहीत, असा सवाल पूर्णेकर कुटुंबीय करीत आहेत. ठाण्याच्या माजी महापौर तथा नगरसेवक मीनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदे हेच हत्येच्या कटामागील मुख्य सूत्रधार आहेत, असा आरोप न करता पूर्णेकर कुटुंबीयांनी त्यांच्या विरोधातील अनेक पुरावेही समोर आणले आहेत.

राजेंद्र शिंदे हा हत्येतील आरोपींना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देत असल्याचा व्‍हीडिओ दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांचे सुपुत्र राम पूर्णेकर यांनी काही दिवसांपूर्वी मीडिया समोर आणले होते. या गुन्ह्याचा ऐंशी टक्के तपास आम्ही केला असून पोलीस तपासात मात्र चौकशी पलीकडे काहीही उलगडा झाला नसल्याचा आरोपही पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य मारेकरी अटकेत असूनही हे हत्यांकड नेमके कोणत्या करणातून घडविले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news