Chhatrapati Sambhajinagar Water conservation Kannad|दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य

Chhatrapati Sambhajinagar- कन्नड तालुक्यात ४ हजार ५५२ कामांना मंजुरी; रोजगारनिर्मितीवर भर
Chhatrapati Sambhajinagar Water conservation Kannad|दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य
Published on: 
Updated on: 

कन्नड : खरीप पाझर तलाव, रिचार्ज पिट, नाल्यांचे पुनरुज्जीवन तसेच भूजल पुनर्भरणाची कामे निश्चित करावीत. तांत्रिक व्यवहार्यता तपासून ही कामे युक्तधारा संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हंगामातील पावसाच्या तुटीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती (ट्रिगर-१) घोषित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत मृदा व जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. कन्नड तालुक्यात ४ हजार ५५२ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

मंजुरीचे पत्र उपजिल्हाधिकारी (रोहयो) रूपेश सिंगारे व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ) गिरीश सोनार यांनी पंचायत समितींना पाठवले आहे.

ग्रामपंचायतींनी गावातील गरजेनुसार शिवार फेरी करून चेकडॅम, केंद्र व राज्य शासनाने अनुज्ञेय केलेल्या ३७५ प्रकारच्या कामांची माहिती ग्रामपंचायतींच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध ऑक्टोबरमध्ये झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामसभेत गावाच्या गावाच्या गरजेनुसार कामांना मंजुरी देऊन त्याचे नियोजन करण्याच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना दिल्या करून आहे.

Chhatrapati Sambhajinagar Water conservation Kannad|दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य
Chhatrapati Sambhajinagar Cyber attack on Bajaj Hospital | बजाज हॉस्पिटलवर सायबर हल्ला

दुष्काळी परिस्थितीत मजुरांना हाताला काम मिळावे, जलसाठ्यांमध्ये वाढ व्हावी आणि ग्रामीण भागातून रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखता यावे या उद्देशाने कामांची नियोजन करण्यात आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Water conservation Kannad|दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य
Chhatrapati Sambhajinagar water crisis| जिल्ह्यातील १४२ गाव, वाड्यांना १७० टँकरद्वारे पाणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news