Matheran News | वाहनतळाअभावी माथेरान घाटात वाहतूककोंडी

Government Inaction Matheran | राजकीय इच्छाशक्तिचा अभावासह शासकीय निष्क्रीयता
Matheran Ghat Congestion
Matheran Traffic(Pudhari Photo)
Published on
Updated on
मिलिंद कदम

Matheran Ghat Congestion

माथेरान : गिरीस्थान माथेरान मधील दस्तूरी येथील वाहनतळाच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणामुळे, तसेच उपलब्ध जागा शुक्रवारी आलेल्या पर्यटकांच्या गाड्यांमुळे भरुन गेल्याने शनिवारी माथेरानला आलेल्या पर्यटकांना आपली वाहने पार्क करण्याकरिता जागाच उपलब्ध झाली नाही, परिणामी माथेरानच्या संपूर्ण घाटात वाहनांच्या रागां लागून राहून मोठी वाहतूक कोंडी झाली होती. परिणामी त्रस्त झालेल्या पर्यटकांनी पून्हा नकोरे माथेरान असे म्हणण्याची वेळ आली होती. तर केवळ शासनाची निष्क्रीयता आणि राजकीय इच्छाशक्तिचा अभाव यामुळेच ही परिस्थिती उद्भवत असल्याचा संताप माथेरानकरांनी व्यक्त केला आहे.

प्रत्येक सुट्ट्यांच्या हंगामात पर्यटकांची माथेरानला पसंती असते, मात्र नेहमीच त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने यापुढे माथेरान नको रे बाबा असे सूर उमटताना दिसत आहेत. दोन दिवस मुलाबाळांना घेऊन इथल्या निसर्ग सान्निध्यात एकरूप व्हावे जेणेकरून नेहमीच्या कामाचा शीण घालविण्यासाठी शांत वातावरणाचे माथेरान हेच एकमेव जवळचे ठिकाण आहे. त्यामुळेच इथे पर्यटकांकडून अधिक पसंती दिली जाते. परंतु स्वतः च्या वाहनाने आल्यास येथील वाहतूक कोंडीमुळे तसेच पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. तरीसुद्धा घाटात मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागत असल्याने भर पावसात मुलाबाळांना घेऊन पर्यटकांना पायपीट करावी लागत असल्याने त्यांचा वेळ व पैसा वायफळ खर्च होत असल्याची तक्रार पर्यटकांकडून करण्यात येत होती.

Matheran Ghat Congestion
Raigad News | पाच महिन्यांत 97 कुमारी माता

अशीच परिस्थिती यापुढेही कायम राहिली तर माथेरानला आगामी काळात पर्यटकांच्या घटत्या प्रमाणास सामोरे जावे लागणार अशी धोक्याची घंटा स्पष्टपणे दिसून येत आहे. नेरळ माथेरान हाच एकमेव मार्ग असल्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध व्हावी अशी मागणी केल्यास राजकीय नेतृत्वे याकडे लक्ष देत नाहीत, अशी तक्रार स्थानिक नागरिक व व्यावसायिकांची आहे.

Matheran Ghat Congestion
Raigad News | सांडपाणी नैसर्गिक नाल्यात सोडल्यामुळे शेती नापीक

नगरपालिका प्लॉट क्र.एम.पी. ९३ची मागणी १८ वर्ष प्रलंबित पर्यावरण संरक्षणाच्या हेतूने ब्रिटीशकाळातील माथेरान गिरिस्थान क्षेत्रात कोणत्याही वाहनांना परवानगी नाही. माथेरान दस्तूरी येथेच वाहने पार्क करावी लागतात. दस्तूरी येथील सध्याच्या वाहनतळावर ५०० वाहने उभी राहू शकतात. मात्र येथे स्थानिक नागरिकांची वाहने पार्क केल्यावर येथे पर्यटकांच्या वाहनांकरिता जागा अपूरी पडते. याच वाहन तळाला लागूनच असलेल्या नगरपालिकेच्या मालकीचा प्लॉट क्र.एम.पी.९३ वाहनतळासाठी मिळावा अशी गेल्या १५ वर्षांपासून मागणी आहे. मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी निर्णय होत नसल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे.

ब्रिटिशकाळातील माथेरान या थंड हवेच्या पर्यटन स्थळाला कायम शासन दरबारी दुय्यम वागणूक दिली जाते. पार्किंग बाबत शासनस्तरावर मागील १८ वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित असताना राजकीय इच्छाशक्ती अभावी प्लॉटचे राज्य शासनाकडून पालिकेला हस्तांतरण होत नाही हे खेदजनक आहे.

शिवाजी शिंद, माजी नगरसेवक, माथेरान

माथेरान दस्तुरी पार्किंगवरील अतिक्रमणे काढून जागा मोकळी करणे आवश्यक आहे. गव्हर्नर हिलकडे जाणारा रस्ता बनविल्यास तिथे गाड्या पार्क होऊ शकतात. प्रशासनाने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे अन्यथा पार्किंग अभावी माथेरानचा सर्व व्यवसाय ठप्प होऊ शकतो.

मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष, माथेरान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news