Raigad Sewage Issue
खोपोली : चौक ग्रुप ग्रामपंचायतने मागील अडीच वर्षापासून चौक, तुपगांव,पाली खुर्द या परिसरातील धनिक व बिल्डर्स यांनी गटारांचे सांडपाणी नैसर्गिक रित्या नाल्यात सोडल्यामुळे शेतक-यांच्या जमीन नापीक होत असल्यामुळे यशवंत सकपाळ सह शेतकरी वर्गांच्या जमिनी नापीक होत आल्यामुळे 5 जून फाशी घेणार होते.
मात्र चौक ग्रुप ग्रामपंचायतीने या शेतीची पाहणी करून लवकरात लवकर या ठिकाणी काम सुरु करणार असल्यांचे लेखी आश्वासन देण्यांत आल्यामुळे फाशी तूर्तास स्थागिती करण्यांत आली आहे. मात्र बातमीमुळे इफेक्ट झाला असून वृतपत्राचे शेतकरी वर्गांनी आभार मानले.
मंगळवारी शासकीय व ग्रामपंचायतचे अधिकारी यांनी जागेची पाहणी करून झाल्यानंतर आमदार महेश बालदी यांच्या ग्रामनिधी फंडातून सदरचे काम पूर्ण होणार असल्यांचे बाधित शेतकरी वर्गांस सांगितले आहे.त्याच बरोबर स्मशान भूमी जवळ साकव बांधण्यात येणार आहे. तसेच बाधित शेतक-यांच्या शेतातून गटार काढण्यात येणार असून दिलेल्या आश्वासनप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत आवश्यक तो फंड लवकरात - लवकरात आणून या ठिकाणी शेतकरी वर्गास दिलासा दिला आहे.
यावेळी पंचायत समिती शाखा अभियंता अनिल जाधव,अल्पना जाधव यांनी 3 जून ला बाधित शेतक-यांच्या शेतीची व नुकसानीची स्थळाची पाहणी केली. तसेच चौक सरपंच ऋतू ठोंबरे,उप सरपंच सुभाष पवार, तुपगांव, उपसरपंच सचिन साखरे, निखिल मालुसरे, पंचायत सदस्य अजिंक्य चौधरी, वृषाली आंबावणे, ग्राम विकास अधिकारी एस.पी.जाधव,तसेच शेतकरी कुंडलिक ठोंबरे, गणेश देशमुख, सचिन सकपाळ, हनुमंते,गुरव, कोंडीलकर बंधू, तसेच खालापूर तहसिलदार, गट विकास अधिकारी, पोलीस प्रशासन यांनी ग्रामपंचायतला बाधित शेतक-यांना फाशी पासून परावृत्त करु सहकार्य करावे असे कळविण्यात आले आहे.