Raigad News | माथेरानमध्ये रुग्णवाहिकेतून प्रवासी वाहतूक?

Matheran Ambulance Misuse | रुग्ण नसताना रुग्णवाहिका एलफिस्टन बंगल्याचे गेटवर; चौकशी करण्याची सुभाष भोसले यांची मागणी
Ambulance Passenger Transport
रूग्णवाहिका (Pudhari Photo)
Published on
Updated on
आनंद सकपाळ

Ambulance Passenger Transport

नेरळ : माथेरान हे जागतिक थंड हवेचे ठिकाण आहे. माथेरानमधील राहणाऱ्या नागरिक व माथेरानमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आजारी व अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांच्या वाहतूकीकरीता असलेली रुग्णवाहिका कार्यान्वित असलेली रूग्णवाहिका ही कोणताही रूग्ण नसताना रात्रीचे सुमारास एलफिस्टन बंगल्याचे गेटवर आढळून आल्याने, ही रुग्णवाहिका रूग्ण की प्रवासी वाहतू‌कीसाठी आहे का? असा सवाल मात्र माथेरान भारतीय जनता पार्टीचे माथेरान शहर उपाध्यक्ष सुभाष भोसले यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात चौकशीची मागणी देखील करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माथेरानमधील राहणाऱ्या नागरिक व माथेरानमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आजारी व अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांच्या वाहतुकीकरीता रुग्णवाहिकेला परवानगी मिळाल्यानंतर ही रूग्णवाहिका ही संस्थेच्या माध्यमातून चालविली जायची. त्यावेळचे माजी नगरसेवक जिमी लॉर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली ही रुग्णवाहिका रुग्णापर्यंत पोहोचत होती. त्यांच्या संस्थेमार्फत अनेक वर्षे उत्तम प्रकारे रुग्णांना सेवा दिली जात होती, त्यानंतर ही रुग्णवाहिका सेवा माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या माध्यमातून चालविली जाऊ लागली. तर काही काळ ही रुग्णवाहिका सेवा ही माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेकडून ठेका पद्धतीने देखील चालविण्यात आली आहे. आता ही रुग्णवाहिका सेवा माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेमार्फत चालवली जात आहे.

Ambulance Passenger Transport
Raigad News | रायगडमधील ६ हजार जलस्रोतांचे सर्वेक्षण

तर माथेरानमध्ये सध्या रुग्णवाहिकेमध्ये रुग्णांचे नावावर प्रवासी वाहतूक केली जात असल्याची चर्चा सुरू असतानाच, माथेरानमधील असलेल्या एलफिस्टन बंगल्यावर केअरटेकर म्हणून राहात असलेल्या व्यक्तीकडे २२ मे रोजी लग्राची पूजा असल्याने, पूजेचे दर्शनासाठी सुभाष भोसले हे गेले असता, रात्रीचे आठच्या सुमारास एलफिस्टन बंगल्याच्या गेटवर रुग्णवाहिका उभी असल्याने, सुभाष भोसले यांनी सदर व्यक्तींना घरी कोणी आजारी पेशंट आहे अशी विचारणा केली की तेव्हा त्यांनी भोसले यांना घरी कोणी आजारी पेशंट नसल्याचे सांगितले असल्याने, रात्री आठचे सुमारास रूग्णवाहिकेचे एलफिस्टन बंगल्याच्या गेटवर काय काम असा प्रश्न पडल्याने, ही रूग्णवाहिका रूग्ण की प्रवासी वाहतूकीसाठी? असा सवाल उपस्थित केला आहे. तर पेशंट नसताना रात्री आठच्या सुमारास रुग्णवाहिकेचे एलफिस्टन बंगल्याच्या गेटवर काय काम होते या संदर्भात लेखी तक्रार करून माथेरान गिरिरुथान नगरपरिषद व हॉस्पिटल प्रशासना सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे माथेरान शहर उपाध्यक्ष सुभाष भोसले यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Ambulance Passenger Transport
Raigad News | रायगडमध्ये कृषी कर्जाचे १८ कोटी थकीत

या प्रकरणी माथेरान हॉस्पिटलमधील डॉ. रूपाली मिसाळ यांना पत्रकारांनी फोन केला आसता, त्यांनी पत्रकारांचा फोन उचललादेखील नाही.

Ambulance Passenger Transport
Matheran Environment | माथेरानच्या पर्यावरणावर अश्वांचा परिणाम

माथेरान हे राज्यातील महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला भेट देतात. त्यामुळे माथेरानला बाराही महिने वर्दळ असते. त्यामुळे या भागात आरोग्य सुविधा व रुग्ण वाहिका सेवा सुसज्ज असणे महत्वाचे आहे.

या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाकडून माहिती घेऊन माध्यमांना माहिती देण्यात येईल.

सदानंद इंगळे, कार्यालय प्रमुख, माथेरान गिरिस्थान नगरपरिषद

२२ मे रोजीच्या रात्री आठचे सुमारास एलफिस्टन बंगल्याच्या गेटवर रूग्णवाहिकेमध्ये कोणताही रूग्ण नसताना या ठिकाणी या रुग्णवाहिकेचे काम काय? व ही रुग्णवाहिका रूग्ण की प्रवासी वाहतूकीसाठी आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने या संदर्भातील चौकशीची मागणी नगरपरिषद व हॉस्पिटल प्रशासनाकडे करणार आहे.

सुभाष भोसले, भाजपा माथेरान शहर उपाध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news