

प्रशांत गोपाळे
खोपोली: व्हायरल ऑडियो क्लिप सर्वांनी ऐकली की लक्षात येईल सरकारला बोलून उपयोग नाही आता रस्त्यावर उतरून लढावं लागेलच; परंतु ती क्लिप सर्व जातीच्या लोकांनी ऐकली पाहिजे, मराठा बांधवांनी तर दहावेळा ऐकावी लक्षात येईल पैशाच्या जोरावर आंदोलन चिरडण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी बोलताना केला आहे.
कर्जतमध्ये टोरंट प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी भेट देण्यासाठी जात असताना खोपोलीत पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी पैशाच्या जोरावर आंदोलन चिरडण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप केला. प्रकल्पाच्या नावाखाली जंगले उद्वस्थ करायाची, प्रकल्प तयार करताना यांचाच सिमेंट, खडी, रेती यांची ते कॉन्ट्रॅक्ट यांचेच त्यामध्यमांतून कार्यकर्त्यांना, पाहुण्यांना मोठं करायचं असा घाट सरकारचा आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल असेही मनोज जरांगे यांनी केला.
पार्टी फंडच्या माध्यमातून कार्यकर्ते, माणसं फोडा, महिलांना पुढं करून बदनाम करा, नाहीतर भाजप पक्ष संपवून टाकेल, अशी भीती वाटत आहे, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. तर पैसा-सत्तेच्या बळावर मराठा आंदोलन मोडून काढण्याचा कट असल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी बोलताना जरांगे यांनी आपले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जो केला जात आहे, ही बाब दुर्दैवी आहे, असे सांगत आपण मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे लढत आहोत. हा लढा यापुढेही सुरू राहील, असे यावेळी स्पष्ट केले. जंगले वाचविली पाहिजेत आणि त्यांचे संवर्धन केले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी यावेळी बोलताना घेतली.