Drought Affected Talukas: राज्यातील दुष्काळसदृश तालुक्यांत वाढ; १० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती; सर्वाधिक सात तालुके कोकणात

रायगडात ४, पालघरमध्ये २ तर रत्नागिरीतील एक तालुका बाधीत; तातडीने पंचनामे करण्याचे आदेश
Drought
DroughtPudhari
Published on: 
Updated on: 

रायगड: राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असलेले १० तालुके आज राज्य शासनाने जाहिर केले असून, त्यांत सर्वाधिक ७ तालुके कोकणातील आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यात सर्वाधिक कर्जत, पेण, तळा आणि महाड हे चार तालुके , पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यांचा समावेश आहे.

राज्यातील उर्वरित तीन तालुक्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने तातडीने पावले उचलली आहेत.

Drought
Maharashtra Illegal Liquor Law: अवैध दारूविक्री रोखण्यासाठी कठोर कायद्याची मागणी; ड्रोन वापरण्याचाही प्रस्ताव

राज्यातील एकूण १० तालुक्यांमध्ये पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीच्या २७ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीनंतर मदत व पुनर्वसन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव विनीता वेद-सिंगल यांनी आज हे आदेश जारी केले आहेत.

रायगड जिल्ह्यातील कर्जत, पेण, तळा आणि महाड तालुक्यांवर सर्वाधिक प्रभाव असल्याचे या निमीत्ताने स्पष्ट झाले आहे तर पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड या दोन तालुक्यांत देखील गंभीर परिस्थिती आहे.

Drought
Railway Charging Point: प्रवाशांनो लक्ष द्या! रेल्वे डब्यांतील रात्री चार्जिंगवर बंदी; पॉवर बँक स्फोटानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

कोकण महसूल विभागातील रायगड व पालघर जिल्ह्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनांना तातडीने तालुक्यांचे पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

प्रमुख ५ पिकांचे २०% सर्वेक्षण

शासनाच्या सूचनेनुसार या सर्व १० तालुक्यांमधील दुष्काळाची तीव्रता विचारात घेऊन केंद्र सरकारच्या निकषानुसार कार्यवाही केली जाणार आहे. यामध्ये संबंधित तालुक्यातील प्रमुख ५ पिकांचे २० टक्के सर्वेक्षण (Ground Truthing) करून त्याचा मंडळनिहाय (Circle-wise) अहवाल तातडीने शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news