रायगड : महाराष्‍ट्र भूषण पुरस्‍कार सोहळा; स्‍वामी भक्‍तीमधील अनुयायी सेवेला

रायगड : महाराष्‍ट्र भूषण पुरस्‍कार सोहळा; स्‍वामी भक्‍तीमधील अनुयायी सेवेला
Published on
Updated on

खारघर; सचिन जाधव महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपनकार अप्पासाहेब धर्माधिकारी याना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान होत आहे. याची जय्यत तयारी खारघर येतील सेकटर 29 मध्ये चालू असून, यासाठी स्वामी भक्तिमधील अनुयायी सेवेत उतरले आहेत.

ना भूतो ना भविष्य हा पुरस्कार सोहळा प्रदान व्हावा ही आस येथे झटत असणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यावर दिसून येत आहे. ऐन उन्हाचा तडाखा असला तरी पोलीस यंत्रणेसह भक्ती मार्गतले अनुयायी गेले 2 दिवस या ठिकाणी मेहनत घेत आहेत.

सकाळी 10.30 वाजता या कार्यक्रमाला सुरवात होणार असून, या कार्यक्रमाला साधारणत 40 लाखहून अधिकचा जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याने पोलीस यंत्रनेने त्याप्रमाणे नियोजन केले आहे. साधारण 20 लाखांहून अधिक श्री सदस्यांचा हा संप्रदाय असून, या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. 2008 साली नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पूरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी गर्दीचे लिम्का बुक जागतिक रेकॉर्डची नोंद आहे.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news