Water Shortage: महाडकरांवरील पाणीटंचाईचे संकट वाढणार

कोथुर्डे धरणात पाच टक्के तर कुर्ला धरणात फक्त चार आठवड्यांचा पाणीसाठा
Water Shortage
Water ShortagePudhari
Published on
Updated on

इलियास ढोकले

नाते: महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन धरणांपैकी रायगड विभागातील कोथुर्डे धरणात केवळ पाच टक्के साठा शिल्लक असून नगरपालिकेच्या मालकीच्या कुर्ला धरणामध्ये चार आठवडा पुढे निवडा पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी दिवसात महाडकरांवरील पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे .

दरम्यान मंगळवारी एमआयडीसीमध्ये शट डाऊन असल्याने पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने प्राप्त झाल्याची माहिती नगरपालिकेच्या सूत्रांकडून देण्यात आली.

Water Shortage
Kharghar Water Crisis: खारघरमध्ये पाण्याचा ठणठणाट; अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई

1999 पासून रायगड विभागातील कोथुर्डे धरणातून महाड नगर परिषदेची वाढती आवश्यकता लक्षात घेऊन पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या 27 वर्षापासून हा पाणीपुरवठा अविरतपणे सुरू असून मागील काही वर्षात झालेल्या सरासरी पावसानंतरही धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने महाडकरांवर पाणी संकट येऊ घातले आहे यामध्येच नगरपालिकेच्या मालकीच्या कुर्ला धरणातही मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण झाल्याने प्रतिवर्षी जून महिन्यातच ही दोन्ही धरणे भरून वाहू लागतात.

सद्यस्थितीमध्ये कुर्ला धरणात सुमारे चार आठवडे पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती नगरपालिका पाणी विभागाचे प्रमुख रोहित भोईर यांनी दिली आहे.

Water Shortage
Sakinaka Attack Case: साकीनाक्यात 18 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला

एमआयडीसीकडूनही महाडला होणारा पाणीपुरवठा मंगळवारी शट डाऊन असल्याने कमी दाबाने झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

मागील एक ते दोन महिन्यापासून महाड शहरातील पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू होता मागील महिन्यात एक दिवसाआड नगरपालिकेने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला होता आगामी आठ दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास महाडकर नागरिकांवर भीषण पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news