Mahad municipal election : महाडमधील 23 हजार 124 मतदार करणार मतदान

दुबार मतदारांची प्रत्यक्ष भेटघेत निवडणूक आयोगमारणारनावासमोरदोनफुल्या; न.पा.चीही तीन पथके नियुक्त
Mahad municipal election
महाडमधील 23 हजार 124 मतदार करणार मतदान(Pudhari File Photo)
Published on
Updated on

महाड : महाडच्या पुढील नगराध्यक्ष कोण, आणि सत्ता कुणाची याच्या चाव्या 23 हजार 124 मतदारांच्या हातांमध्ये असतील. प्रारुप मतदार यादीनुसार महाड नगरपालिका क्षेत्रात 11 हजार 491 पुुरुष तर 11633 महिला मतदारांची नोंदणी झालेली आहे. हीच प्रारुप मतदार यादी अंतीम असेल. पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या 142 ने अधिक आहे.

महाड शहरात 359 दुबार मतदार आढळून आले आहेत. शहरातील दोन केिंवा त्यापेक्षा अधिक प्रभागांमध्ये त्यांचे नावे आढळून आले आहे. या दुबार मतदारांची प्रत्यक्ष भेट घेवून , कोणत्या प्रभागात त्यांचे नाव ठेवायचे, कोणत्या प्रभागातून त्यांचे नाव वगळायचे हे निश्चित करण्यासाठी नगरपालिकेची तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

Mahad municipal election
MSRTC mismanagement : एस.टी. महामंडळाचा गलथान कारभार

निवडणूक आयोगानेंही या दुबार मतदारांच्या नावासमोर दोन फुल्या (स्टार) मारले आहेत. या दुबार मतदारांकडून ते कोणत्या प्रभागात मतदान करणार आहेत, याबाबतचा एक फॉर्म भरुन घेण्यात येणार आहे. एखाद्या मतदाराने हा फॉर्म भरुन दिला नाही तर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तो ज्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाईल, तेथे मी अन्य मतदान केंद्रावर मतदान करणार नाही,असे हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे.

प्रभाग निहाय स्त्री -पुरुष मतदार

महाड शहरातील प्रभागनिहाय मतदार असे महाड शहरातील एकूण 23 हजार 124 मतदारांपैकी प्रभाग निहाय स्त्री -पुरुष मतदार असे आहेत.प्रभाग 1 - एकूण मतदार 2 हजार 389 पैकी, पुुरुष -1 हजार 167, महिला- 1 हजार 222, प्रभाग 2- एकूण मतदार 2 हजार 742 पैकी, पुरुष- 1 हजार 359, महिला - 1 हजार 383, प्रभाग 3- एकूण मतदार 1 हजार 732 पैकी, पुरुष- 895, महिला - 837, प्रभाग 4- एकूण मतदार 2 हजार 515 पैकी, पुरुष -1 हजार 226 , महिला - 1 हजार 289 प्रभाग 5- एकूण मतदार 2 हजार 73 पैकी, पुरुष -1 हजार 34, महिला - 1 हजार 39, प्रभाग 6- एकूण मतदार 2 हजार 693 पैकी, पुरुष-1 हजार 332 , महिला- 1 हजार 361, प्रभाग 7 - एकूण मतदार 2 हजार 660पैकी पुरुष 1 हजार 304 , महिला- 1 हजार 356, प्रभाग 8 - एकूण मतदार 1 हजार 730पैकी, पुरुष -889, महिला -841, प्रभाग 9- एकूण मतदार 2 हजार 101 पैकी, पुरुष- 1 हजार 58 , महिला- 1 हजार 43, प्रभाग 10 -एकूण मतदार 2 हजार 489, पुरुष - 1 हजार 227, महिला- 1 हजार 262 मतदार असल्याची माहिती निवडणूक शाखेतून प्राप्त झाली आहे.

Mahad municipal election
Raigad municipal elections : पालिका निवडणुका आघाडीतर्फेच लढणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news