Ganesh Idol Making: महाडमध्ये गणेशमूर्तीकारांची लगबग अंतिम टप्प्यात

यंदा गणेशमूर्तींच्या दरात वाढीचे संकेत; तालुक्यातील कार्यशाळांमधून वीस हजार मूर्तींची होते निर्मिती
Ganesh Idol Making
Ganesh Idol MakingPudhari
Published on
Updated on

श्रीकृष्ण बाळ

महाड: कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात आगामी पंधरा दिवसात श्री मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनाची चाहूल सुरू झाली असून महाड शहर आणि तालुक्यातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये सध्या लगबग वाढली आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेशमूर्ती घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मूर्तींना आकर्षक रंगरंगोटी आणि सजावटीचा अंतिम हात दिला जात आहे. यंदा मात्र मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाढलेल्या किमतीमुळे गणेशमूर्तींच्या दरातही वाढ झाली आहे.

Ganesh Idol Making
Sugar Factories FRP Payment: एफआरपीच्या हप्त्यांच्या करारात त्रुटी आढळल्यास कारखान्यांना दणका; साखर आयुक्तांच्या कडक सूचना

महाड शहरात गणेशमूर्ती बनविणारे सुमारे १० ते १२, तर तालुक्यात १५ ते २० कारखाने आहेत. या कारखान्यांमधून दरवर्षी शहर व तालुक्यात मिळून तब्बल २० हजार गणेशमूर्तींची निर्मिती केली जाते.

महाडमध्ये तयार होणाऱ्या या मूर्तींना मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिक यांसह विविध मोठ्या शहरांमध्येही मोठी मागणी असते. त्यामुळे महाडच्या मूर्तिकारांच्या कलेला गणेशोत्सवाच्या काळात मोठी बाजारपेठ उपलब्ध होते.

महाडमधील पंकज पवार यांच्या चिंतामणी कला केंद्रात यंदा विविध प्रकारच्या सुमारे ७०० गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. तर लाडवली येथील उमेश आर्ते यांच्या कारखान्यात सुमारे ३ हजार मूर्ती तयार केल्या जात आहेत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या दोन्हींसह शहर व तालुक्यातील जवळपास सर्वच कारखान्यांमध्ये मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

यंदा गणेशमूर्तींच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. दीड फुटी मूर्तीच्या दरात सुमारे ५०० रुपये, दोन फुटी मूर्तीच्या दरात १ हजार रुपये, तर तीन फुटी मूर्तीच्या दरात १ हजार ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, रंग तसेच इतर खर्च वाढल्याने ही दरवाढ करावी लागल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

Ganesh Idol Making
Shrivardhan ST Depot: श्रीवर्धन डेपोला घरघर! जुन्याच बसेस, चालक-वाहकांची कमतरता

पंकज पवार यांनी सांगितले की, यंदा पारंपरिक मूर्तींसोबतच चिंतामणी आणि वारकरी वेशभूषेतील गणेशमूर्तींना विशेष मागणी आहे. भक्तांच्या आवडीनुसार विविध आकार, रूप आणि आकर्षक वेशभूषेतील मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, गिरीश साळी यांच्या कारखान्यात यंदा सुमारे ३०० गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या असून, मूर्तींच्या दरात २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

मूर्तिकारांची अंतिम धावपळ

गणेशोत्सव जवळ येत असल्याने आता मूर्तींच्या रंगकामाला वेग आला आहे. डोळ्यांची रेखीव रंगसंगती, मुकुट, दागिने, वस्त्रालंकार आणि आकर्षक सजावट यामुळे कार्यशाळांमध्ये गणरायाचे विविध रूप अधिकच खुलून दिसत आहे. दरम्यान, वाढत्या मागणीसोबतच वाढलेल्या खर्चाचे आव्हान पेलत यंदाही ‘गणरायाच्या आगमनासाठी’ महाडचे मूर्तिकार सज्ज झाले आहेत.

वाढलेल्या खर्चाचे आव्हान

पुढील काही दिवसांत तयार झालेल्या मूर्ती ग्राहकांच्या मागणीनुसार मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिक तसेच अन्य शहरांकडे रवाना होणार आहेत. मातीपासून गणरायाचे रूप साकारत वर्षभराच्या कष्टांना अंतिम आकार देणाऱ्या महाडच्या मूर्तिकारांसाठी हा काळ सर्वाधिक धावपळीचा असतो. वाढत्या मागणीसोबतच वाढलेल्या खर्चाचे आव्हान पेलत यंदाही ‘गणरायाच्या आगमनासाठी’ महाडचे मूर्तिकार सज्ज झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news