Mahad Dumping Ground: महाड डम्पिंग ग्राउंडमुळे 21 वाड्यांचे आरोग्य धोक्यात; कचराअन्यत्र हटवण्याची नागरिकांची मागणी

गोंडाळे गावासह 21 वाड्यांमधील ग्रामस्थ आक्रमक
Mahad Dumping Ground
Mahad Dumping GroundPudhari
Published on
Updated on

इलियास ढोकले

नाते: महाड नगर परिषदेच्या लाडवली (ता. महाड) येथील कचरा डम्पिंग ग्राउंड मुळे पाचशे मीटरवर असलेल्या गोंडाळेसह सुमारे 21 वाड्या वस्त्यांवरील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

यामुळे त्रस्त झालेल्या संतप्त नागरिकांनी नगरपालिकेवर धडक देऊन नगराध्यक्ष सुनील कविस्कर व मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांची भेट घेतली व डम्पिंग ग्राउंड त्वरित बंद करण्याची मागणी गोंडाळे ग्रा.पं.चे सरपंच आशिष खताते, उपसरपंच घनश्याम शेडगे यांच्यासह गोंडाळे गावाच्या परिसरातील 21 वाड्यावरील ग्रामस्थांनी केली आहे.

Mahad Dumping Ground
Government Officer Housing Size: शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता मोठ्या आकाराची निवासस्थाने; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा निर्णय

महाड शहरात संकलित करण्यात येणारा ओला व सुका कचरा हा थेट महाड शहरा पासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लाडवली येथील डम्पिंग ग्राउंड मध्ये नेण्यात येतो, त्या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. तसेच या कचऱ्यावर. शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केले जात असल्याचे नगर परिषदेचे म्हणणे आहे.

महाड शहरातून संकलित करण्यात येणारा रोजचा शेकडो टन कचरा हा लाडवली येथील डम्पिंग ग्राउंड वर नेला जातो, मात्र या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढवली गोंडाळे, देऊळकोंड तसेच परिसरातील 21 वाड्यांना मोठ्या प्रमाणावर या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास होतो. मागील आठ दिवसापासून दुर्गंधीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे मैदानच्या व बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार या परिसरातल्या संतप्त ग्रामस्थांनी आज महाड न. प.च्या मुख्याधिकाऱ्यांकडे मांडली.

न.प.च्या लाडवली येथील कचरा डम्पिंग ग्राउंडमुळे या परिसरात असणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांवर या कचरा डेपोमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अनेक वृद्ध व्यक्ती व महिलांना देखील या कचरा समस्यांचा शारीरिक परिणाम जाणवत असल्याच्या तक्रारी यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी मांडल्या, येत्या आठ दिवसात हा कचरा डेपो इथून व्हावा अशी मागणी देखील त्यांनी केली.

यावेळी लाडवली येथील ग्रामस्थांनी नगराध्यक्ष यांची त्यांच्या कक्षात भेट घेतली असता महाडचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी लाडवली कचरा डेपोमुळे होणाऱ्या दुर्गंधी बाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Mahad Dumping Ground
konkan water scarcity: कोकणात पाणीटंचाईच्या झळा तीव्र, धरणांमध्ये 48 टक्के जलसाठा; मेमध्ये संकट आणखी भीषण होणार?

कचरा डेपोमुळे गोंडाळे येथील नदी प्रदूषित

महाड नगर परिषदेच्या लाडवली येथील कचरा डेपोमुळे मोठ्या प्रमाणावर गोंडाळे येथील नदी प्रदूषित झाली आहे. या प्रदूषित नदीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी दुर्गंधीयुक्त झाले असून जनावरांना तसेच महिला वर्गांना देखील ग्रामस्थांना या पाण्याचा उपयोग होत नसल्याने आजूबाजूच्या विहिरी देखील प्रदूषित झाल्या आहेत.

याबाबत महाड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या समोर नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचला, त्यावर नगर परिषदेमार्फत फवारणी चालू असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले मात्र ग्रामस्थ आक्रमक झाले व त्यांनी या कचऱ्या डेपो बाबत फवारणी वगैरे काही नको तुम्ही कचरा डेपोचबंद करा, अशी मागणी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

त्यानंतर ग्रामस्थ थेट नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या कक्षात जाऊन मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा केली मात्र ग्रामस्थ आक्रमक झाले असून नगर परिषदेच्या या कचरा डेपोमुळे होणारे वायू प्रदूषण लक्षात घेता तातडीने निर्णय घेऊन येत्या आठ दिवसात हा प्रकल्प येथून बंद करा, अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news