konkan water scarcity: कोकणात पाणीटंचाईच्या झळा तीव्र, धरणांमध्ये 48 टक्के जलसाठा; मेमध्ये संकट आणखी भीषण होणार?

कोकणात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; पाच जिल्ह्यांत 170 टँकर
Raigad Water Issue
Raigad Water IssuePudhari
Published on
Updated on

रायगड: कोकण विभागात एप्रिलच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका वाढल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. कोकणातील पालघर,ठाणे,रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या पाच जिल्ह्यात असलेल्या एकूण 173 धरणांतील पाणी पातळी तिव्र उन्हाळा आणि बाष्पीभवनाच वाढलेला वेग यामुळे वेगाने खालावू लागली असून 173 धरणांमध्ये 48.77 टक्के म्हणजे 1806.97 दशलक्ष घनमिटर उपयूक्त जलसाठा शिल्लक आहे.

Raigad Water Issue
Maharashtra labour rule: माथाडींच्या पाठीवरचे ओझे झाले हलके! पन्नास किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांवर बंदी

एप्रिल 2026 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण कोकण विभागात 170 टँकरद्वारे 520 गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत टँकरच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, मे महिन्यात ही टंचाई आणखी भीषण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Raigad Water Issue
Vidhan Parishad Election: विधान परिषद; कोणाला संधी, कोणाचा पत्ता कटणार? निवडून येण्यासाठी 28 ते 29 मतांचा कोटा आवश्यक

कोकण विभागात रायगड जिल्ह्याला पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यात सध्या 60 टँकर कार्यरत असून 180 वाड्या-वस्त्या तहानलेल्या आहेत. विशेषतः महाड, पोलादपूर, पेण आणि खालापूर तालुक्यांतील डोंगराळ भागात परिस्थिती गंभीर आहे. वाढती मागणी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आता खासगी टँकर अधिग्रहित करण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याची पाणी टंचाईची विदारक स्थिती यंदाही कायम आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी प्रमुख धरणे याच क्षेत्रात असूनही, एकट्या शहापूर तालुक्यात 35 टँकर सुरू आहेत. पालघरमधील जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या आदिवासी बहुल पट्ट्यात नैसर्गिक जलस्रोत आटल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू झाली आहे.

कोकणात दरवर्षी सरासरी 3 हजार मिमी पाऊस पडतो. पुरपरिस्थिती निर्माण होते. मात्र दरवर्षी उन्हाळी पाणी टंचाईला कोकणवासीयांना सामोरे जावेच लागते. कोकणातील तिव्र उताराच्या नद्यामधून पावसाचे पाणी अत्यंत वेगाने वाहात जावून समुद्रास जावून मिळते.

सद्यस्थितीत कोकणातील पालघर,ठाणे,रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या पाच जिल्ह्यात असलेल्या एकूण 173 धरणांतील पाणी पातळी तिव्र उन्हाळा आणि बाष्पीभवनाच वाढलेला वेग यामुळे वेगाने खालावू लागली असून 14 एप्रिल 2026 रोजी या 173 धरणांमध्ये 48.77 टक्के म्हणजे 1806.97 दशलक्ष घनमिटर उपयूक्त जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी हा उपयूक्त शिल्लक जलसाठा 51.24 टक्के होता, त्यात यंदा 2.48 टक्क्याने घट झाली आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अहवालानुसार, तापमानामुळे मे 2026 अखेरपर्यंत टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. कोकणात मोठे धरण प्रकल्प 11 असून त्यांची जलसंकलन क्षमता 2693.21 दशलक्ष घनमिटर आहे. सद्यस्थितीत हा जलसाठा 46.12 टक्के म्हणजे 1308.47 दशलक्ष घनमिटर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news