

सुधीर नाझरे
मुरुडजंजिरा: अलिबाग पोयनाड येथील कुर्डुस गावात सॅन १९९१ पासून चालत आलेले हि अविस्मरणीय दहीहंडी चे परंपरा मानवी मनोरे न रचता विहिरीवरील दहीहंडी फोडण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील दही हंडी पथके येथे येऊन हा थरार अनुभवतात तसेच या दही हंडीचे आयोजन देवळाली गोविंदा पथक कुर्डुस यांच्या मार्फत केले जाते.
पराग पिंगळे ,सचिन पिंगळे ,गुरुनाथ शेरामकर ,सुशीलकुमार पिंगळे ,गणेश केणी असे सर्व पिंगळे परिवार याचे कार्यवाहक म्हणून काम पाहतात आणि मोठ्या उत्सहाने हे दही हंडी साजरी करतात. ह्यावर्षी दहीहंडीसाठी मुंबईहून पत्रकार छायाचित्रकारांची हजेरी लावली होती. यंदा ही हंड फोडण्याचा माऩ हर्ष जीवन पिंगळे यांने पटकावला.
विहिरीवरील दहीहंडीचे विशेष म्हणजे जमिनीवरील मनोरे सर्वच ठिकाणी होतात. पण इकडे गावातील मोठ्या विहिरीवर आजूबाजूच्या गावातील गोविंदा हंडी फोडण्यासाठी येतात.
विहिरीवर गोल कठड्यावर बसून काहीजण गोविंदाला हाताच्या पंज्यात उचलून हंडीच्या दिशेने उडवतात गोविंदानी उंच उडून दहीहंडीला हात लावून विहिरीत मध्यभागी पाण्यात पडायचं जरा अंदाज चुकला तर गोविंदा विहिरीच्या कठड्यावर पडू शकतो म्हणूनच विहिरीच्या कठड्यावर इतर गोविंदा बसलेला असतात.
गावच्या एकजुटीतून सण साजरा
या परंपरेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उडी मारताना किंवा हंडीला स्पर्श करताना गोविंदा थेट खाली विहिरीतील पाण्यात पडत असल्याने आजवर ३० हून अधिक वर्षांत एकाही गोविंदाला दुखापत झालेली नाही. कोणत्याही व्यावसायिक स्पर्धेविना केवळ गावच्या एकजुटीतून हा सण साजरा केला जातो. हा थरार पाहण्यासाठी अलिबागसह मुंबई, पुणे आणि ठाण्यातूनही हजारो नागरिक कुर्डुस गावात गर्दी करतात.