Panvel Police Action: पनवेलच्या दोन बारमध्ये अश्लील नृत्याचा धिंगाणा!११ महिलांना अटक

शहर पोलिसांची कारवाई; साऊंड सिस्टीमवर मोठ्या आवाजात गाणी
 Bar Raid
Bar RaidPudhari
Published on
Updated on

पनवेल: अंगावर तोकडे कपडे परिधान करून ग्राहकांच्या अंगाशी लगट करीत अश्लील हावभाव आणि नृत्य करण्याचा प्रकार पनवेलमधील दोन बारमध्ये सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे.

सप्तगिरी बार आणि ग्रिटझ बार ॲण्ड रेस्टॉरंटवर पनवेल शहर पोलिसांनी केलेल्या स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण ११ महिला आढळून आल्या.

 Bar Raid
Mumbai Malaria Cases: चाचण्या वाढल्या; मलेरियावर मात अजून दूरच! संसर्ग निर्देशांकाची वाढ चिंताजनक

पनवेल शहर पोलिसांचे पथक रात्रीच्या गस्तीवर असताना संबंधित बारमध्ये नियमांचे उल्लंघन सुरू असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांनी पंचांसह दोन्ही बारवर धाड टाकली.

सप्तगिरी बारवर रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. पोलिस पथक बारमध्ये पोहोचले असता मोठ्या आवाजात साउंड सिस्टीमवर गाणी सुरू होती. ग्राहक मद्यपान आणि खाद्यपदार्थांचे सेवन करीत होते.

त्याचवेळी काही महिला तोकडे कपडे परिधान करून ग्राहकांच्या अंगाशी लगट करीत अंगविक्षेप, अश्लील कृत्ये आणि नृत्य करीत असल्याचे पोलिसांना आढळले. या कारवाईत सहा महिला आणि दोन पुरुष वेटर आढळून आले.

 Bar Raid
BMC New Hall: मुंबई पालिकेची सभा २०२८ मध्ये नव्या सभागृहात!

त्यानंतर पोलिसांनी काळुंद्रे येथील ग्रिटझ बार ॲण्ड रेस्टॉरंटवर रात्री अकराच्या सुमारास धाड टाकली. येथेही साउंड सिस्टीमवर मोठ्या आवाजात गाणी सुरू होती. ग्राहक मद्यपान करीत असताना काही महिला तोकडे कपडे घालून ग्राहकांच्या अंगाशी लगट करीत अश्लील हावभाव आणि नृत्य करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत पाच महिला आणि दोन पुरुष कर्मचारी आढळून आले. या कारवाईमुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

नेमके चाललेय काय?

पनवेलमध्ये बारच्या नावाखाली नेमके चालले आहे तरी काय? असा प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित झाला आहे. नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांचे मनोरंजन करण्याच्या नावाखाली अश्लील प्रकारांना प्रोत्साहन दिले जात असल्यास संबंधित बारचालकांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news