Khopoli temple theft : खोपोली हादरली! ऐतिहासिक विरेश्वर मंदिरात धाडसी चोरी; २० लाखांचे चांदीचे आच्छादन लंपास

चोरीची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
Khopoli temple theft : खोपोली हादरली! ऐतिहासिक विरेश्वर मंदिरात धाडसी चोरी; २० लाखांचे चांदीचे आच्छादन लंपास
Published on
Updated on

खोपोली : खोपोलीतील ऐतिहासिक विरेश्वर मंदिरात पहाटेच्या सुमारास धाडसी चोरीची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य सुरक्षा व्यवस्थेला बगल देत, मागील दरवाजातून प्रवेश करून भगवान शंकराच्या पिंडीवरील सुमारे १२ किलो वजनाचे आणि अंदाजे २० लाख रुपये किमतीचे चांदीचे आच्छादन लंपास केले.

Khopoli temple theft : खोपोली हादरली! ऐतिहासिक विरेश्वर मंदिरात धाडसी चोरी; २० लाखांचे चांदीचे आच्छादन लंपास
Kolhapur Theft Case | नागावात चोरट्यांचा धुमाकूळ! पोलीस अधिकाऱ्याच्या घरासह ३ ठिकाणी चोरी; १५ लाखांचा ऐवज लंपास

ही धक्कादायक घटना आज पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांची ही संपूर्ण कृती मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, यात दोन संशयित चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत.

Khopoli temple theft : खोपोली हादरली! ऐतिहासिक विरेश्वर मंदिरात धाडसी चोरी; २० लाखांचे चांदीचे आच्छादन लंपास
Sambhajinagar Crime News : सिडकोत चोरांचा धुमाकूळ सुरूच, आता 'मंदिरेही' असुरक्षित

चोरीची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news