Raigad ST Bus: गणेशभक्तांनो, परतीच्या प्रवासाची चिंता नको! रायगड एसटीच्या ४३९ बसेस सज्ज; २६५ अतिरिक्त बसेसही तयार

गौरी-गणपती विसर्जनानंतर रायगड एसटी महामंडळाचे नियोजन; राज्यातील इतर विभागांतीलही बसेस मागविणार
ST Bus
ST BusFile Photo
Published on
Updated on

पेण: गणेशोत्सवापूर्वी कोकणात बाप्पाच्या आगमनासाठी गेलेल्या कोकणवासी गणेशभक्तांचा पाच दिवसांच्या गौरी गणपती विसर्जनानंतर आपल्या जन्मभूमीतून पुन्हा एकदा कर्मभूमीकडे परतीचा प्रवास सुरू होत आहे.

त्यांचा हा परतीचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी रायगड एसटी आगार सज्ज झाले असून यंदा रायगड एसटी विभागाच्या सर्वच्या सर्व आगारातून जवळपास साडेचारशे बसेस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत तर ऐनवेळी गर्दी वाढलीच तर गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी देखील २६५ बसेसचे नियोजन रायगड एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

ST Bus
Women Farmer Certificate: सक्षमीकरणासाठी महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख

दरम्यान ज्याप्रमाणे गणेशभक्तांनी कोकणात जाताना आपला एसटीचा प्रवास सुखकर केला आहे, तसाच परतीचा प्रवास देखील एसटीनेच सुखरूपपणे करावा असे आवाहन रायगड एसटी महामंडळाचे विभाग प्रमुख डॉ. सुहास चौरे यांनी गणेशभक्त प्रवाशांना केले आहे.

गणेशोत्सव हा कोकणातील एक महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो. कोकणातील जवळपास साठ ते सत्तर टक्के नागरिक हे आपल्या उदरनिर्वाहासाठी किंवा व्यवसायानिमित्त मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या महत्वाच्या शहरांमध्ये जरी स्थायिक झालेले असले तरी कोकणात म्हणजेच आपल्या जन्मभूमीत पूर्वापार पार पडत असणारा गणेशोत्सव ते न विसरता उत्सवाच्या काही दिवस अगोदरच आपल्या कोकणांत दाखल झालेले असतात.

या उत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर असणारी वाहनांची रेलचेल आणि काही तासातच आरक्षण फुल झालेली कोकण रेल्वे हे याचे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे कोकणात बाप्पाच्या उत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासी गणेशभक्तांना एसटी महामंडळाच्या वतीने सुखरूप आणि खिशाला परवडणाऱ्या प्रवासाची सोय करून दिली होती, त्याच प्रकारची व्यवस्था परतीच्या प्रवासात केली आहे.

ST Bus
Andhericha Raja Ganpati: 'अंधेरीचा राजा' च्या देखाव्यात श्री राम मंदिराची झलक

यंदा रायगड एसटी विभागाने महाड, अलिबाग, पेण, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरूड, माणगाव या आठ आगारांच्या माध्यमातून २० सप्टेंबर साठी ३८९ बसेस होत्या तर २१ सप्टेंबरसाठी ५० बसेस अशा एकूण ४३९ म्हणजेच जवळपास साडेचारशे बसेस सज्ज ठेवल्या आहेत.

तर २० सप्टेंबर रोजी ऐनवेळीसाठी १६० बसेस होत्या आणि २१ सप्टेंबर रोजी ऐनवेळीसाठी १०५ अशा एकूण २६५ बसेसची व्यवस्था केली आहे. तर या बसेस देखील कमी पडत असतील तर प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी राज्यातील इतर विभागातील बसेस देखील उपलब्ध करून देण्याची तयारी एसटी महामंडळाने दर्शवली आहे.

गणेशोत्सव हा कोकणातील महत्वाचा सण आहे, त्यामुळे कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड विभागाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे कोकणात जाण्यासाठी एसटी बस सज्ज ठेवल्या होत्या त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासासाठी देखील आम्ही योग्य ते नियोजन केले आहे. ज्याप्रमाणे कोकणवासी गणेशभक्त प्रवाशांनी कोकणांत जाताना एसटीला पसंती दिली तीच पसंती परतीच्या प्रवासात देखील देऊन एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनावर असणारा विश्वास ते सार्थ ठरवतील याची खात्री आहे.

- डॉ. सुहास चौरे, विभाग प्रमुख, एसटी महामंडळ, रायगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news