Khandala Missing Link Accident: निसर्गाच्या मोहात 'काळ' आला होता, पण 'आयुष्य' उरलं!

'मिसिंग लिंक'चा पूल पाहण्याच्या नादामध्ये कार दरीत कोसळली
Khandala Missing Link Accident
Khandala Missing Link AccidentPudhari
Published on
Updated on

खोपोली: खंडाळा घाटातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाच्या बाबतीत अत्यंत थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित 'मिसिंग लिंक'चा भव्य पूल जवळून पाहण्याचा मोह एका कारचालकाच्या अंगाशी आला.

कच्च्या रस्त्यावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट ५० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून दरीतील एका झाडामध्ये कार अडकल्याने चालकाचा जीव वाचला आहे.

Khandala Missing Link Accident
Illegal Fishing: उरणमध्ये पावसाळी मासेमारी बंदीचे उल्लंघन; दोन नौकांवर उरण मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई

सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास बांद्रा (मुंबई) येथील रहिवासी स्वरूप भटनागर (वय ५९) हे आपल्या स्कोडा कारने एकटेच खंडाळा घाटातील गारमाळ परिसरात फिरण्यासाठी आले होते. गारमाळ परिसरात आल्यावर तेथून समोरच दिसणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा विलोभनीय पूल पाहण्याचा भटनागर यांना मोह झाला.

पुलाच्या दिशेने जाणाऱ्या एका कच्च्या रस्त्यावरून कार चालवत असताना, अचानक स्वरूप भटनागर यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि क्षणात कार अनियंत्रित होऊन खोल दरीच्या दिशेने वेगाने कोसळली.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटचे प्रभारी अधिकारी स्वप्निल पाटील यांनी तातडीने सूत्रे हलवली.

Khandala Missing Link Accident
POP Ganesh Idol Rules: पनवेलमधील बाप्पांचे विसर्जन कृत्रिम तलावातच; पीओपीच्या सहा फुटांखालील गणेशमूर्तींबाबत महापालिकेचा निर्णय

त्यांनी पोलीस हवालदार संदीप पवार, पोलीस शिपाई किरण शिंदे, भरत पवार, गणेश खाडे आणि संतोष गुज्जरवार यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केले. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी अतिशय बिकट परिस्थितीत शर्थीचे प्रयत्न सुरू केले. दरीत झाडाला अडकलेल्या कारमधून चालक स्वरूप भटनागर यांना पोलिसांनी सुरक्षितपणे बाहेर काढले.

पोलिसांच्या या ऐनवेळच्या तत्परतेमुळे चालकाचे प्राण वाचले असून त्यांनी पोलीस पथकाचे मनःपूर्वक आभार मानले. घाटातील अनोळखी किंवा कच्च्या रस्त्यांवरून वाहन चालवताना चालकांनी अत्यंत दक्षता बाळगावी. निसर्गरम्य परिसर किंवा नवीन प्रकल्प जवळून पाहण्याच्या मोहात कच्च्या रस्त्यांवर वाहने नेऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

झाड ठरले 'देवदूत', मोठा अनर्थ टळला

कार दरीत कोसळत असताना खाली काही फुटांच्या अंतरावर असलेल्या एका भक्कम झाडाला जाऊन ती जोरात अडकली. कारमध्ये भटनागर हे एकटेच प्रवास करत होते. जर कार या झाडाला अडकली नसती, तर ती सुमारे ५० फूट खोल दरीत थेट कोसळून त्यांचा दुर्दैवी अंत झाला असता. झाडाचा भक्कम आधार मिळाल्याने आणि नशीब बलवत्तर असल्याने भटनागर या भीषण अपघातातून सुरक्षित बचावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news