Illegal Fishing: उरणमध्ये पावसाळी मासेमारी बंदीचे उल्लंघन; दोन नौकांवर उरण मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई

या दोन्ही नौका तात्काळ ताब्यात घेऊन करंजा-नवापाडा बंदरात अवरुद्ध करण्यात आल्या आहेत.
Illegal Fishing
Illegal FishingPudhari
Published on
Updated on

उरण: राज्यभरात लागू असलेल्या पावसाळी मासेमारी बंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे मासेमारीसाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन नौकांवर उरण मत्स्यव्यवसाय विभागाने मोठी कारवाई केली आहे. या दोन्ही नौका तात्काळ ताब्यात घेऊन करंजा-नवापाडा बंदरात अवरुद्ध करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ससून डॉक (मुंबई) येथे नोंदणीकृत असलेल्या 'आई भवानी' मालक - गणेश लालू राठोड, कफ परेड, मुंबई आणि 'लक्ष्मी नारायण' मालक - विनोद नरेश राठोड, कफ परेड, मुंबई) या दोन मासेमारी नौका रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अंबुजा सिमेंट कंपनीजवळील खाडीत उभ्या होत्या. एका बर्फाच्या गाडीतून या नौकांमध्ये बर्फ भरून त्या पावसाळी बंदीच्या काळात बेकायदेशीरपणे समुद्रात मासेमारीसाठी जाण्याच्या तयारीत होत्या.

Illegal Fishing
POP Ganesh Idol Rules: पनवेलमधील बाप्पांचे विसर्जन कृत्रिम तलावातच; पीओपीच्या सहा फुटांखालील गणेशमूर्तींबाबत महापालिकेचा निर्णय

या प्रकाराची माहिती मिळताच उरणचे परवाना अधिकारी सुरेश शंकरराव बावूलगावे यांनी तीन सागरी सुरक्षा रक्षकांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला आणि दोन्ही नौकांवर कारवाई केली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व २०२१ अंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

Illegal Fishing
Suran Cultivation: ठाणे जिल्ह्यात प्रथमच होणार सुरणाची शेती

दोन्ही नौका करंजा-नवापाडा बंदरात रोखून ठेवण्यात आल्या असून, या कारवाईचा सविस्तर अहवाल रायगड-अलिबागचे सहाय्यक आयुक्त तथा अभिनिर्णय अधिकारी यांच्याकडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती परवाना अधिकारी सुरेश बावूलगावे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news