Raigad Political News : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना अटक आणि सुटका

३ सप्टेंबर रोजीचे महाएल्गार आंदोलन टाळण्यासाठी कारवाई; पोलीस अधिकाऱ्यांची माहिती
Raigad Political News
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना अटक आणि सुटकाpudhari photo
Published on
Updated on

खोपोली : प्रशांत गोपाळे

बेरोजगारीवरून ३ सप्टेंबर रोजी महाएल्गार आंदोलनाची खालापुरात सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांना २ सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटक केली. बुधवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली. घारे यांच्यासह पंकज पाटील, सुनील पाटील, संतोष बैलमारे, दीपक श्रीखंडे, अंकित साखरे, सुरेश पाटील, कैलास गायकवाड, रवींद्र रोकडे, रियाज पठाण, सागर जाधव, कैलास गायकवाड, रविंद्र रोकडे, केतन घारे, आश्विनीताई पाटील यांना अटक करून अलिबागला घेवून गेल्याने कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. त्यामुळे खालापूरात तणावपूर्वक वातावरण निर्माण झालेे. ३ सप्टेंबरला होणारे आंदोलन टाळण्यासाठी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल पाटील यांनी आहे.

गोदरेज आणि टाटा कंपनी विरोधात महाएल्गार आंदोलन काही तासांवर असताना या आंदोलनाला तहसिलदारांनी परवानगी नाकारली आहे. तरीही चर्चेतून मार्ग काढण्यासाठी सुधाकर घारे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवून अटक केल्याची घटना २ सप्टेंबर रोजी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. घारे यांना अटक करून अलिबागला घेवून गेल्याने कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले असून खालापूरात तणावपूर्वक वातावरण निर्माण झाले आहे.

Raigad Political News
Raigad News : सुधागडातील मूलभूत प्रश्नांवरून अधिकाऱ्यांना तंबी

खालापूर तालुक्यातील मोठ्याप्रमाणात कारखानदारी स्थानिक तरुण तरुणींना नोकरीपासून वंचित ठेवले जात आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी राजकीय चपला बाजूला ठेवून तरुणांच्या हक्कासाठी महाएल्गार आंदोलनांची तयारी सुरू करून सर्व पक्षीयांना बरोबर घेत वाटचाल सुरू केल्याने 3 सप्टेंबरला सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर पाठिंबा दिल्याने जोरदार तयारी केली होते. त्याचा धसका कारखानदारीसह प्रशासनानेही घेतल्याने आंदोलनांची परवानगी नाकारली असली तरी आंदोलनकर्ते ठाम असल्याने पोलीस प्रशासन अलर्ट झाल्याने मोठ्याप्रमाणात पोलीस फौजफाटा खालापुरात दाखल झाला आहे, त्यामुळे खालापूर तालुक्याला छावणीचे स्वरूप आले आहे.

Raigad Political News
Supriya Sule : ॲमेझाॅन, रिंग मेट्रोला आमचा विरोध

महामार्ग रोखला, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनंंतर आंदोलन स्थगित

खोपोली : महाएल्गार आंदोलन काही तासांवर असताना या आंदोलनाला तहसिलदारांनी परवानगी नाकारली आहे. तरीही चर्चेतून मार्ग काढण्यासाठी सुधाकर घारे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवून अटक केल्याची घटना २ सप्टेंबर रोजी ४ वाजण्याच्या सुमारास अटक करून अलिबागला घेवून गेल्याने कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. कर्जतच्या सभापती नमिता घारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दोन तास रस्ता रोखून धरला होता. त्यामुळे तातडीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे खालापुरात येऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा करून मंगळवारी, बुधवारी यासंदर्भात बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन देऊन सुधाकर घारे व सर्व सहकारी वर्गाला सोडण्यात आल्याची घोषणा केली.

जवळपास ७ ते ८ हजार कार्यकर्ते व कामगार तरुण तरुणी रस्त्यावर उतरल्याने पोलीस प्रशासना बरोबर काहींची झटापटही झाली. मात्र सर्व परिस्थिती हाताळत खासदार सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना संयमाची भूमिका घेण्याचे अहवान केल्याने कार्यकर्ते शांत झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सुनील तटकरे यांच्या मोबाईल वरून स्पीकर फोन वरून जनसमुदायाशी बोलल्या नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news