

खोपोली ः शेतकरी शेती करीत असतांना अनेक समस्या निर्माण होत असतात. शेती टिकून रहावी तसेच निर्माण होत असलेल्या समस्या मार्गी लावण्यात यावी.नुकताच जयराम घोंगे उसरोली येथिल शेतकऱ्याची गाभण म्हैस डॉक्टरांना संपर्क करून प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे व त्यांच्या हलगर्जी पणामुळे मृत्यू झाली.
सदर नायब तहसिलदार, गटविकास अधिकारी यांस वरद विनायक शेतकरी सामाजिक संस्था खालापूर या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी नायब तहसिलदार खालापूर यांच्या उपस्थित शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी, फार्मर आयडी, आंबा नुकसान भरपाई, भात नुकसान भरपाई, व पशुवैद्यकीय डॉक्टर अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा या समस्यांबाबत चर्चा करून निवेदन देण्यांत आले. त्याच बरोबर गटविकास अधिकारी खालापूर यांस शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या समवेत माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद रायगड भाई शिंदे, माजी सभापती नरेश पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत उपस्थिती नोंदवली.
सदर निवेदन देण्यासाठी वरद विनायक शेतकरी सामाजिक संस्था खालापूर तालुका खानाव, पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. सल्लागार खंडू पाटील, कान्होजी जाधव, सचिव मंगेश धामणसे, उपाध्यक्ष राजेश मोरे, सहसचिव विजय वाघमारे, दिनेश शिंदे, जयदास घोंगे, राजाराम मुसळे, विष्णू पाटील, जयवंत पाटील, माजी सरपंच चिलठण गौतम ओव्हाळ आदी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.