

खोपोली ः गेले काही परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असल्यामुळे शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दिवस प्रखर उष्णता आणि सायंकाळी पावसाचे आगमन यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला आहे. भात शेतीच्या लोंब्यांचा दाणा तयार झाला असून काही ठिकाणी भात कापणी सुरु केली आहे. कारण उन्हाच्या तिव्रतेने लोंब्यातून दाणा अलग होत असून कापणी केली नाहीतर हाताला दाणा मिळणार नाही. याच विचारांतून भात कापणी सुरु केली आहे.
दिवाळी सण आधी बहुतांशी ठिकाणी भात कापणी सुरुवात झाली आहे. मात्र आता परतीच्या पावसाने बळीराजांस मोठ्या संकटात सापडलेले आहे. भात कापणी करावी की नाही हेच विचार त्यांस स्वस्त बसू देत नाही. त्यास बरोबर दुपारी रणरणत्या उन्हाची दाहकता वाढली असून भात कापणींस मजूर मिळणे कठीण झाले आहे. यामुळे घरातील कुटुंब भात कापणी कडे वळले आहे. त्यातच सायंकाळी सोसाट्याचा वारा आणी पाऊस शिवाय भाताच्या लोंब्यातील दाणा तयार झाला असून त्याच्या वजनांने भात शेतीत पडत आहे.
तोंडाशी आलेला घास वाया जावू नये यासाठी बळाराजांने कंबर कसली कसे ही करुन भात कापणी करुन ती सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करु या विचारांतून भात कापणी सुरु असून पुन्हा एकदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे कापलेल्या भातावर पाणी पडल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. यामुळे कापलेल्या कडप्पा पावसाच्या पाण्यामुळे भिजून गेल्या आहेत हीच स्थित काही दिवस सुरुच राहिली तर बळीराजाच्या शेतीचे मोठे नुकसान होईल. मात्र परतीच्या पावसाचा काही नेम नाही यामुळे बळीराजा चांगलाच धास्तावले आहे.
परतीच्या पाऊस शांत झाला असे वाटत असताना शिवाय भाताच्या लोंब्यामध्ये दाणा तयार झाला असून आणि प्रखर उन्हाच्या उष्णतेने भातापासून दाणा अलग होत असल्यामुळे आम्ही शेतकरी वर्गांनी भात कापणी केली. मात्र आता परतीच्या पाऊसाने धुमाकूळ घातल्यामुळे भात शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत सापडला असून परतीच्या पावसाने शांती घ्यावी अशी सर्व शेतकरी देवाला साकडे घालत आहेत.
गोकुळ कदम, बीडखुर्द शेतकरी