Kashedi Tunnel Warli Art: वारली कलेने खुलला कशेडी बोगदा; कोकण संस्कृतीची अनोखी सफर

स्थानिक कलावंताचा आविष्कार
Kashedi Tunnel Warli Art
Kashedi Tunnel Warli ArtPudhari
Published on
Updated on

अलिबाग: कशेडी घाटातील धोकादायक व वेड्यावाकड्या वळणांमुळे प्रवाशांसाठी त्रासदायक ठरणारा प्रवास आता बोगद्यामुळे अधिक सुलभ आणि वेगवान झाला आहे. मात्र, हा प्रवास केवळ सोयीस्करच नव्हे तर संस्मरणीयही व्हावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने कशेडी बोगद्याच्या प्रवेश आणि निर्गमन मार्गावर आकर्षक वारली पेंटिंग साकारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या चित्रकलेमुळे बोगद्याच्या सौंदर्यात मोठी भर पडली असून, महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांचे आणि वाहनचालकांचे विशेष लक्ष वेधले जात आहे.

बोगद्याच्या भिंतींवर कोकणातील लोकजीवन, येथील पारंपरिक संस्कृती, सण-उत्सव, ग्रामीण जीवनशैली तसेच विविध पक्षी आणि प्राण्यांचे चित्रण करण्यात आले आहे. कोकणातील निसर्गसंपदा आणि लोकसंस्कृती यांचा सुंदर मिलाफ या चित्रांमधून अनुभवायला मिळत आहे. विशेष म्हणजे, वारली कलेची पारंपरिक शैली कायम ठेवत त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन अशा भूमितीय आकारांच्या साहाय्याने ही चित्रे साकारण्यात आली आहेत.

Kashedi Tunnel Warli Art
Raigad Kerosene Distribution: गॅस सिलिंडर टंचाईने रेशनला आलाय भाव; रायगडसाठी १२० किलो लिटर रॉकेल मंजूर

वारली पेंटिंग ही महाराष्ट्रातील आदिवासी वारली समाजाची पारंपरिक लोककला असून ती भारतातील सर्वात प्राचीन लोककलांपैकी एक मानली जाते. मातीच्या लालसर पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगात रेखाटण्यात येणारी ही कला साधेपणातही प्रभावी संदेश देणारी म्हणून ओळखली जाते.

Kashedi Tunnel Warli Art
Navi Mumbai News: मत्स्यबंदी असतानाही प्रवासी बोटी सुरूच

कशेडी बोगद्यातील चित्रांमधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची झलक प्रवाशांना अनुभवता येत आहे. कोकणाच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देणारा हा उपक्रम पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असून, आधुनिक विकासकामांसोबत स्थानिक कला आणि संस्कृती जपण्याचा एक सुंदर प्रयत्न म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

जाणाऱ्या पर्यटकांना प्रवासादरम्यान विरंगुळा मिळावा आणि त्यांचा थकवा दूर व्हावा, या संकल्पनेतून ही वारली पेंटिंग साकारण्यात येत आहे. विशेष म्हणजे, स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण निशांत वाघे याने ही सुंदर वारली पेंटिंग साकारली आहे.

- पंकज गोसावी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news