Kashedi Tunnel lights : महामार्गावरील कशेडी बोगद्यातील अंधार अखेर दूर

तांत्रिक बिघाडामुळे वायूविजन यंत्रणेसह पथदिवे होते बंद; अपघातांचा वाढलेला धोका
Kashedi Tunnel lights
Kashedi Tunnel lightspudhari photo
Published on: 
Updated on: 

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील खंडित झालेला अत्यावश्यक गेल्या काही दिवसां-पासून बोगद्यातील वीजपुरवठा अखेर पूर्ववत झाला आहे. दिवे बंद असल्याने वाहनचालकांना विशेषतः गणेशभक्तांना अंधारातूनच प्रवास करावा लागत होता. यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला होता.

राष्ट्रीय महामार्ग विभागासह संबंधित ठेकेदाराने गंभीर दखल घेत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. यामुळे मंगळवारी सकाळ-पासून बोगदा अखेर प्रकाशमय झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

Kashedi Tunnel lights
Raigad Illegal Liquor Transport : गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात करोडी बोगद्यात खंडित वीजपुरवठ्यासह वायूविजनची यंत्रणा ठप्प झाली होती. या नव्या समस्येमुळे गणेशभक्तांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला होता सप्टेंबर २०२६ च्या मध्यास (गणे-शोत्वच्या दरम्यान) चिपळूण बाजूच्या प्रवेशद्वाराकडील सुमारे ५०० मीटर अंतरावरील बोगद्यातील पथदिवे बंद पडल्याने आणि ५० टक्के भाग अंधारात असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.

राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने या तांत्रिक बिघाडाची तात्काळ दखल घेऊन दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे, ज्यामुळे बोगद्यातील प्रकाशव्यवस्था आता सुरळीत झाली आहे.

Kashedi Tunnel lights
Mandai-cha Raja : लालबागच्या राजाच्या धर्तीवर साकारतोय 'मंडईचा राजा'!

कोकणवासियांचा प्रवास सुरक्षित

बोगद्यात पुन्हा पूर्ण प्रकाश उपलब्ध झाल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात चाकरमान्यांचा आणि इतर वाहनचालकांचा प्रवास आता अधिक सुरक्षित व सुसह्य झाला आहे. कशेडी घाटातील हा २ किमी लांबीचा बोगदा पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने पूर्वीचा ४० ते ५० मिनिटांचा धोकादायक प्रवास आता अवघ्या १० मिनिटांत पार पडत आहे.

पाण्याचा पाझर, गळती होण्याची शक्यता

वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी पावसाळी वातावरणामुळे काही ठिकाणी अंतर्गत पाण्याचा पाझर, गळती होण्याची शक्यता असल्याने त्यामुळे बोगद्यातून प्रवास करताना वाहनांचा वेग मर्यादित ठेवणे आणि खबरदारी बाळगणे आवश्यक बनले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news