Raigad Illegal Liquor Transport : गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

माणगाव पोलिसांकडून दुचाकीसह १ लाख ५२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Raigad Illegal Liquor Transport
Raigad Illegal Liquor Transportpudhari photo
Published on: 
Updated on: 

माणगाव : माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करत दुचाकीसह तब्बल १ लाख ५२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या गोपनीय माहिती-नुसार माणगाव पोलिसांनी वावे, दिवाळी परिसरात सापळा रचून लक्ष्मण झिमाजी कोकरे (वय ३८, व्यवसाय शेती, रा. कारावे, पो. घाटव, ता. रोहा, जि. रायगड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येत असलेली मोटारसाय-कलही पोलिसांनी जप्त केली.

Raigad Illegal Liquor Transport
Kalyan Dombivli Illegal Hoardings : कल्याण-डोंबिवलीला अनधिकृत होर्डिंग्जचा विळखा

पोलिसांनी केलेल्या कारवाईत तांदूळ ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिवळ्या रंगाच्या पिशवीत लपवून ठेवलेली गावठी हातभट्टीची दारू, तसेच अन्य साहित्य आढळून आले. यामध्ये सुमारे २० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय पोलिसांनी हिरो कंपनीची एक्स्ट्रीम मोटारसायकल (अंदाजे किंमत १ लाख २५ हजार रुपये) आणि विवो कंपनीचा मोबाइल (अंदाजे किंमत २२ हजार रुपये) असा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ५२ हजार २०० रुपये असल्याचे पोलीस नोंदीत नमूद आहे.

Raigad Illegal Liquor Transport
Dombivli Ganeshotsav : डोंबिवलीच्या टिळकनगर बाप्पाला ८६ पदार्थांचा अन्नकोट

या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ६५ (अ) व ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम

गावठी हातभट्टीची दारू केवळ कायद्याचा प्रश्न नसून तिच्या सेवनामुळे अनेक कुटुंबांवर सामाजिक आणि आर्थिक संकट ओढवते. त्यामुळे अशा अवैध दारूची निर्मिती, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई होणे आवश्यक आहे. माणगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news