Kashedi Ghat Accident | कशेडी घाटात पेप्सी वाहतूक करणारा कंटेनर पलटी; एक लेन पूर्ण बंद!

Kashedi Ghat Accident | मुंबई–गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुंबई दिशेने जाणारा पेप्सी वाहतूक करणारा कंटेनर पलटी झाल्याने एक लेन पूर्णपणे बंद झाली आहे.
Kashedi Ghat Accident | कशेडी घाटात पेप्सी वाहतूक करणारा कंटेनर पलटी; एक लेन पूर्ण बंद!
Published on
Updated on

पोलादपूर : धनराज गोपाळ

मुंबई–गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुंबई दिशेने जाणारा पेप्सी वाहतूक करणारा कंटेनर पलटी झाल्याने एक लेन पूर्णपणे बंद झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात बुधवारी सकाळी घडला.

Kashedi Ghat Accident | कशेडी घाटात पेप्सी वाहतूक करणारा कंटेनर पलटी; एक लेन पूर्ण बंद!
Nashik Farmers Protest | 'नाफेड' कार्यालयात दहा तास ठिय्या

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कंटेनर चालक राम आचल मिंद (रा. उत्तर प्रदेश) हा आपल्या ताब्यातील कंटेनर क्रमांक एमएच ४३ जीई २२४४ घेऊन लोटे ते भिवंडी-वाडा असा प्रवास करत होता.

कशेडी घाटात पोलादपूरजवळ चोळई गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला. या अपघातात कंटेनरमधील पेप्सीच्या बाटल्या महामार्गावर सर्वत्र अस्ताव्यस्त पसरल्या असून कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने एक लेन पूर्णपणे बंद झाली आहे.

Kashedi Ghat Accident | कशेडी घाटात पेप्सी वाहतूक करणारा कंटेनर पलटी; एक लेन पूर्ण बंद!
Gadchiroli Ganja Seizure | कोरची तालुक्यातून 15 लाखांचा गांजा जप्त, आरोपीस अटक

या घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंढे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच कशेडी महामार्ग पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावरील वाहतूक पोलादपूर–खेड दिशेने जाणाऱ्या एकाच लेनवर वळवून सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण झाला नाही.

सदर अपघातग्रस्त कंटेनरमधील महामार्गावर पडलेल्या पेप्सीच्या बाटल्या बाजूला करण्याचे तसेच क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news